तक्षकाला संरक्षण देणाऱ्या इंद्राचं आसन वाचू शकलं नाही, उद्धवजी तुमचं काय वाचणार? भाजपचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 15:09 IST2022-03-09T15:08:45+5:302022-03-09T15:09:31+5:30
भाजपकडून मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासूनच राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत मलिक यांनी राजीनामा दिलेला नाही अथवा राज्यातील ठाकरे सरकारनेही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही.

तक्षकाला संरक्षण देणाऱ्या इंद्राचं आसन वाचू शकलं नाही, उद्धवजी तुमचं काय वाचणार? भाजपचा घणाघात
मुंबई - राज्यातील उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या राजिनाम्याच्या मुद्द्यावरू राज्यातील राजकारण जबरदस्त तापले आहे. आज मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीने मुंबईत मोर्चा काढला जात आहे. मोर्चापूर्वी झालेल्या भाषणात भाजप आमदार आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "अरे तक्षकाला संरक्षण देणाऱ्या इंद्राचं आसन वाचू शकलं नाही, उद्धवजी तुमचं आसंन काय वाचणार? असा सवाल करत शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली.
भाजपकडून मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासूनच राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत मलिक यांनी राजीनामा दिलेला नाही अथवा राज्यातील ठाकरे सरकारनेही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच चिघळले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जात आहे. आझाद मैदान ते मेट्रो थिएटर असे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात, याकूब मेमनला फाशी देऊ नका, असे म्हणणारा एक लुच्चा मंत्री आहे. याच वेळी त्यांनी आंदोलनासाठी जमलेल्या लोकांना हा मंत्री कोण, अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. तसेच, मलिकांचा राजिनामा घ्या. नवाब मलिकचा राजीनामा घ्यायचाय आहे, असेही ते यावेळी म्हणाते.
म्हणतात, महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही. अरे पण केवळ तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असा टोलाही यावेळी शेलार यांनी ठाकरे सरकारला लगावला. यावेळी पुराणातील एक उदाहरण देत, "अरे एकदा इंद्रानेही तक्षक नावाच्या नागाला संरक्षण दिले होते. काय झाले, नंतर इंद्राचे आसनही वाचू शकले नाही. उद्धवजी मग तुमचे आसन काय वाचणार? असा सवालही आषिश शेलार यांनी केला.