१९ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

By admin | Published: January 10, 2017 04:52 AM2017-01-10T04:52:30+5:302017-01-10T04:52:30+5:30

अंबरनाथ येथील मोरिवली गावातील चिखलोली एमआयडीसीमधील, सेंटॉर फार्मास्युटिकल प्रा. लि. या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या

Capture of 19 crores | १९ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

१९ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

Next

ठाणे : अंबरनाथ येथील मोरिवली गावातील चिखलोली एमआयडीसीमधील, सेंटॉर फार्मास्युटिकल प्रा. लि. या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने, १८ कोटी ८५ लाखांचा ७५४ किलो अल्प्राझोलम हा अमली पदार्थ हस्तगत केला आहे. दोन दिवसांपूर्वी ठाण्यात विक्रीसाठी आलेल्या दोघांकडून सहा किलो अल्प्राझोलम हस्तगत केले होते. आतापर्यंत या प्रकरणी चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून १९ कोटींचा ७६० किलो ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली.
ठाण्यात अल्प्राझोलमच्या विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. त्याआधारे ६ जानेवारी २०१७ रोजी येथील आनंद दिघे टॉवर परिसरातून लवकुश पप्पू गुप्ता (२६) आणि अमित भीमराव गोडबोले (३२, दोघेही राहणार अंबरनाथ) यांना रात्री ९ वा.च्या सुमारास ताब्यात घेतले असता, त्यांच्या अंगझडतीत १५ लाखांचा सहा किलोचा अल्प्राझोलम हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल करण्यात आला. हा माल त्यांनी बसवराज भंडारी (२७, रा. अंबरनाथ) याच्याकडून आणल्याचे उघड झाल्यानंतर, त्याचीही या पथकाने धरपकड केली, तेव्हा अनिल राजभर (२५, रा. अंबरनाथ) यांनी सेंटॉर फार्मास्युटिकल या कंपनीतून तो माल काढल्याची त्याने माहिती दिली. पथकाने या कंपनीत छापा टाकून पोटमाळ्यावरील एका कॅ व्हिटीत दडवलेल्या ७५४ किलो वेगवेगळ्या या कंपनीतून अमली पदार्थांमध्ये (नार्कोटिक्स) मोडणारे २७ प्रकारचे सायकोट्रॉपिक पूरक (सबस्टन्स ड्रग्ज), इतर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आणि रसायन असे ५५ प्रकारच्या पदार्थांचे उत्पादन तयार केले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: Capture of 19 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.