शिवणयंत्रांचा टेम्पो पकडला
By admin | Published: February 6, 2017 01:53 AM2017-02-06T01:53:02+5:302017-02-06T01:53:02+5:30
येथील मांजरसुंबा रोडवर रविवारी रात्री ८च्या सुमारास पोलिसांनी शिवणयंत्रे असलेला मिनी टेम्पो ताब्यात घेतला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बचतगटांना वाटण्यासाठी ही यंत्रे आणल्याची तक्रार भाजपाने केली.
पाटोदा (जि. बीड) : येथील मांजरसुंबा रोडवर रविवारी रात्री ८च्या सुमारास पोलिसांनी शिवणयंत्रे असलेला मिनी टेम्पो ताब्यात घेतला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बचतगटांना वाटण्यासाठी ही यंत्रे आणल्याची तक्रार भाजपाने केली.
मांजरसुंबा रोडवरील एका हार्डवेअर दुकानात उतरविलेली १० शिवणयंत्रे ही यंत्रे एनसीपीचे उमेदवार महेंद्र गर्जे यांनी बचतगटांच्या महिलांना वाटण्यासाठी आणली असून, मतदारांना आकर्षित करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार त्यांनी केली. (प्रतिनिधी)
मशीनशी संबंध नाही
भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नाही. ही शिवणयंत्रे संदीप थोरवे या व्यापाऱ्याच्या असून, त्यांनी ती बीडहून व्यवसायासाठी खरेदी केली आहेत. त्यांची एकूण किंमत ५४ हजार रुपये असून, तशा पावत्याही त्यांच्याकडे आहेत, असा दावा महेंद्र गर्जे यांनी केला आहे.
टेम्पो ताब्यात असून खातरजमा केली जात आहे. भरारी पथकाचे प्रमुख गणेश मोरे बाहेरगावी आहेत. त्यांची तक्रार आल्यानंतरच कारवाई केली जाईल.
- डी. एम. चव्हाण, पोलीस निरीक्षक, पाटोदा