‘हलणा-या कार’ने मेडिकल परिसरात खळबळ

By Admin | Published: August 13, 2016 11:37 PM2016-08-13T23:37:37+5:302016-08-13T23:48:07+5:30

आमिर खानच्या पीके चित्रपटासारख्या ‘हलणा-या कार’ने मेडिकल परिसरात खळबळ उडवून दिली. कारमधील अर्धनग्न युवती आणि तिच्या प्रियकराला पाहून पोलीस आणि मोठ्या संख्येतील

The car with a moving car thrilled in the medical area | ‘हलणा-या कार’ने मेडिकल परिसरात खळबळ

‘हलणा-या कार’ने मेडिकल परिसरात खळबळ

googlenewsNext
>अश्लिलतेचा कळस : पोलिसांनी जोडप्याला घेतले ताब्यात 
 
नागपूर : आमिर खानच्या पीके चित्रपटासारख्या ‘हलणा-या कार’ने मेडिकल परिसरात खळबळ उडवून दिली.  कारमधील अर्धनग्न युवती आणि तिच्या प्रियकराला पाहून पोलीस आणि मोठ्या संख्येतील बघ्यांच्या लक्षात ‘अंदरकी बात’ आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या जोडप्याला विचारपूस करण्यासाठी अजनी ठाण्यात नेली अन् नंतर त्यांची मुक्तता केली.
शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अजनी पोलिसांचे वाहन गस्त करीत होते. पोलिसांना मेडिकलच्या मर्च्यूरीकडे एक कार उभी दिसली. कारच्या काचांवर काळी फिल्म लावली असल्याने आतमध्ये कोण आहे, ते दिसत नव्हते. मात्र, कार हलत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांचा संशय बळावला. संशयाच्या आधारेच पोलिसांनी कारचे दार उघडले अन् आतमधील दृष्य पाहून काही वेळेसाठी पोलीसही चक्रावले. तर, गणवेषातील पोलीस पाहून गोंधळलेल्या आतमधील तरुणीने भलत्याच स्थितीत कारमधून बाहेर पडत पार्किंगकडे धाव घेतली. तिची अवस्था पाहून ती मनोरुण असावी, असा अंदाज काढत काही जणांनी तिच्या अंगावर स्कार्फ टाकला. तिला थांबवून तिची विचारपूस केली. पोलिसांनी कारमधील त्या व्यक्तीला विचारपूस केली. त्या तरुणीलाही पुन्हा कारजवळ आणले. तोपर्यंत आजूबाजूंच्या मंडळींनी कारजवळ गर्दी केली. दोघांनीही प्रेयसी अन् प्रियकर असल्याचे पोलिसांना सांगितले. तोपर्यंत पोलिसांसोबतच बघ्यांनाही  काय प्रकार आहे, ते लक्षात आले होते. त्यामुळे तेथील वातावरण बदलू लागले. ते पाहून पोलिसांनी या जोडप्याला सरळ अजनी ठाण्यात नेले. तेथे दोघांचेही बयान घेण्यात आले. दोघेही सज्ञान  आणि त्यांना कायद्याची माहिती असूनही त्यांनी मर्च्युरीसारख्या ठिकाणाजवळ नको ते कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करावी, असा पोलिसांना प्रश्न पडला. दुसरीकडे कारवाई केल्यास बदनामी होईल, यावेळी क्षमा करा. पुन्हा असे करणार नाही, अशी आर्जव  रडकुंडीला आलेले हे जोडपे करीत होते. त्यामुळे अजनी पोलिसांनी हे प्रकरण जास्त न ताणता जुजबी कारवाई करीत जोडप्याला समज देत सोडून दिले.

Web Title: The car with a moving car thrilled in the medical area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.