कारची झाडाला धडक; भावंडं ठार

By admin | Published: December 7, 2014 12:25 AM2014-12-07T00:25:13+5:302014-12-07T00:25:13+5:30

कापड खरेदी करून नागपूरवरून अहेरीकडे येत असताना सँट्रो कार झाडाला जबरदस्त धडकल्याने झालेल्या अपघातात अहेरी येथील कापड व्यावसायिक आर्इंचवार बंधू जागीच ठार झाले.

Car tree hit; Siblings killed | कारची झाडाला धडक; भावंडं ठार

कारची झाडाला धडक; भावंडं ठार

Next

चौडमपल्लीलगतची घटना : नागपूरवरुन येताना अपघात
अहेरी/आष्टी (जि. गडचिरोली) : कापड खरेदी करून नागपूरवरून अहेरीकडे येत असताना सँट्रो कार झाडाला जबरदस्त धडकल्याने झालेल्या अपघातात अहेरी येथील कापड व्यावसायिक आर्इंचवार बंधू जागीच ठार झाले. अहेरीपासून २२ किमी अंतरावर चौडमपल्ली महाकाली मंदिरालगत शनिवारी पहाटे ५ वाजता हा अपघात झाला. या भीषण अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
अहेरी येथील बाजारपेठ शुक्रवारी बंद राहत असल्याने कापड व्यावसायिक महेश विजय आर्इंचवार (३७) व अभय विजय आर्इंचवार (३६) हे दोघेही नागपूर येथे खरेदीसाठी एमएच ३४ के ५३५९ या सँट्रो कारने गेले होते. नागपूरवरून रात्री १२.३० वाजताच्या सुमारास ते अहेरीकडे परत निघाले. थंडीमुळे दाट धुक्यातच त्यांचा प्रवास सुरु होता. धुक्यामुळे समोरचे अंधुक दिसत होते. त्यामुळे पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांची कार झाडाला धडकली. या अपघातात विजय व अभय आर्इंचवार हे दोघेही भाऊ जागीच ठार झाले. चालक पंकज शुद्दलवार (२३) रा. अहेरी याचे हात व पाय फ्रॅक्चर झाले. उमेश सेकृतीवार (२२) रा. अहेरी याच्या डोक्याला जबर दुखापत झाली तर रवी बोम्मेन (२२) रा. कन्नेपल्ली हे गंभीर जखमी झाले. तिघांवरही चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. घटनेच्यावेळी स्वत: मृतक महेश आर्इंचवार हे वाहन चालवीत होते.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.
या घटनेमुळे शनिवारी अहेरीतील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. मृतक महेश याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व अभय याच्या मागे पत्नी, एक मुलगी व आईवडील असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अहेरी येथील प्राणहिता नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Car tree hit; Siblings killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.