भरधाव कार शिरली माजी मंत्र्यांच्या बंगल्यात
By admin | Published: May 28, 2016 02:42 PM2016-05-28T14:42:07+5:302016-05-28T14:43:08+5:30
माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या रामदासपेठेतील बंगल्यात धडकलेल्या एका भरधाव कारने काही वेळेसाठी चांगलीच खळबळ उडवून दिली
Next
style="font-family: HelveticaNeue, 'Helvetica Neue', Helvetica, Arial, 'Lucida Grande', sans-serif; font-size: 16px;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २८ - : माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या रामदासपेठेतील बंगल्यात धडकलेल्या एका भरधाव कारने काही वेळेसाठी चांगलीच खळबळ उडवून दिली. या कारने वडेट्टीवार यांच्या बंगल्याच्या गेटची मोडतोड केली अन् नंतर आलिशान होंडा कारला धडक देत सात ते आठ लाखांचे नुकसान केले.
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामदासपेठमध्ये माजी मंत्री वडेट्टीवार यांचा आलिशान बंगला आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी भरधाव वॅगनआर (एमएच ४३ / एएफ २८१७) कार त्यांच्या बंगल्याचे दार तोडून आत शिरली. कारने दर्शनी भागातील गार्डनचे कठडे तोडल्यानंतर बाजूला असलेल्या होंडा कार (एमएच ३१/ ०२३४) ला जोरदार धडक मारली. या धडकाधडकीचा आवाज ऐकून आतमधील कर्मचारी बाहेर धावले. त्यांनी वॅगनआरचा चालक आरोपी मनोज बबनराव वडे (वय ३०, रा. झिंगाबाई टाकळी) याला पकडले. नंतर सीताबर्डी ठाण्यात राहूल ठाकरे नामक कर्मचा-याने माहिती दिली. पीएसआय नागरे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामादी केला. आरोपी मनोजला ताब्यात घेतले. या घटनेनंतर वडेट्टीवार यांच्या बंगल्यावरील निलेश सीताराम हरले यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपी मनोज वडेला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली.