हृदयविकाराने पोलिसाचा मृत्यू
By admin | Published: September 19, 2016 05:45 AM2016-09-19T05:45:50+5:302016-09-19T05:45:50+5:30
हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध झालेल्या भांडुप पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत टेकवडे (५७) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला.
मुंबई : बंदोबस्तावेळी हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध झालेल्या भांडुप पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत टेकवडे (५७) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. टेकवडे यांच्या पार्थिवावर त्यांच्या पुण्यातील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भांडुप पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले टेकवडे हे ९ सप्टेंबरच्या रात्री भांडुप स्थानक रोड सिग्नलवर कर्तव्य बजावत होते. रात्री ११च्या सुमारास चक्कर येऊन ते रस्त्यावर कोसळले. अन्य सहकारी पोलिसांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला देत उपचारांसाठी मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र रविवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)