ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घ्यावी

By admin | Published: January 2, 2017 02:15 AM2017-01-02T02:15:45+5:302017-01-02T02:15:45+5:30

शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात.

Care for the safety of the senior citizens | ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घ्यावी

ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घ्यावी

Next

पिंपरी : शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. त्यांना विरंगुळा म्हणुन उद्याने, तसेच विरंगुळा केंद्र सुरू करावीत. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने सर्वांत जास्त गैरसोय ज्येष्ठ नागरिकांची होते. त्यांच्या या समस्येकडे कोणी लक्ष देत नाही. महापालिकेने शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावीत. लोकप्रतिनिधींकडे याबाबत मागणी केल्यास तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. आम्ही सुविधा देतो. असे उत्तर त्यांच्याकडून येते, याबद्दल नागरिक आश्चर्य व्यक्त करतात.

पिंपरी: महापालिका हद्दीतील प्रत्येक वॉर्ड हा मॉडेल वॉर्ड झाला पाहिजे. अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सार्वजनिक वाचनालये ठिकठिकाणी उभारली गेली. परंतु त्या वाचनालयात वृत्तपत्र ठेवण्याची जबाबदारी कोणाची? हे अद्याप लक्षात येत नाही. त्यामुळे ही सार्वजनिक वाचनालये नावापरुती उरली आहेत. या वाचनालयांची जबादारी संबंधित नगरसेवकांनी घेतली पाहिजे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्येचे गांभीर्य राहिलेले नाही. वॉर्डात रस्त्यावर पडलेला खड्डा असेल. लहान मुले खेळतात, अशा ठिकाणी विद्युत डीपी धोकादायक स्थितीत उघडा असेल तर नागरिक तक्रार देतात. मात्र त्या तक्रारीची दखल गांभीर्याने घेतली जात नसल्याने उपाययोजना होत नाहीत. अधिकाऱ्यांची याबाबत जबाबदारी निश्चित केली पाहिजे. नागरिक तक्रार करतात, त्यामागे त्यांचा काही उद्देश असतो. त्यांची गैरसोय होत असते. हे लक्षात घ्यायला हवे. अशा भावना ज्येष्ठ नागरिक व्यकत करतात. गृहप्रकल्प साकारतात. लोकवस्ती वाढते, त्यानुसार सुविधा पुरविण्याचे नियोजन होत नाही. सुविधांवर ताण येतो. म्हाडा सोसायटी हद्दीत नव्याने इमारती झाल्या आहेत.त्यानुसार सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे.


महापालिकेने क्रीडांगणे उपलब्ध करून द्यावीत
महापालिकेकडून विविध विकास प्रकल्प राबवले जात असताना, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, याकरिता ठिकठिकाणी क्रीडांगणे,व्यायाम शाळा सुरू कराव्यात. ज्येष्ठ नागरिकांना शुद्ध हवेत फेरफटका मारण्यासाठी जॉगिंग ट्रॅक उपलब्ध करून द्यावा. महापालिकेतर्फे दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी. जेणेकरून गरीब कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देता येईल. खासगी शाळांमधील शिक्षण गरिबांना परवडणारे नाही. महापालिकेनेच प्राथमिक दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. -बी आर माडगूळकर

बसथांबे ऊउन, पावसात निरूपयोगी,
महापालिकेने ठिकठिकाणी उभारलेले बसथांबे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणारे नाहीत. अनेक ठिकाणच्या बसथांब्यांना शेड नाही. बसथांब्यांची उंची, शेड व रचना कोणत्याही दृष्टीने सोईस्कर ठरणारी नाही. हे बसथांबे असून नसल्यासारखेच आहेत. केवळ जागा अडवायची म्हणून बसथांबे उभारले असावेत, असेच वाटते. - लक्ष्मण भूमकर


आम्हाला हे हवे...
सार्वजनिक वाचनालयात वृत्तपत्र असावीत

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असावे

वॉर्डामध्ये महापालिकेने दवाखाने सुरू करावेत

महापालिकेने इंग्रजी शाळा सुरू कराव्यात

संगीत अकादमीचे विकेंद्रीकरण करावे

वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस असावेत

Web Title: Care for the safety of the senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.