युथ फेस्टिव्हलमुळे कलांची जोपासना
By Admin | Published: August 8, 2014 12:27 AM2014-08-08T00:27:03+5:302014-08-08T00:27:03+5:30
विद्याथ्र्यांना शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्नात उत्तुंग भरारी मारण्याची संधी लाभली आहे.
>अलिबाग : विद्याथ्र्यांना शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्नात उत्तुंग भरारी मारण्याची संधी लाभली आहे. युथ फेस्टिवलमुळे विद्याथ्र्यांना लाभलेल्या संधीचा प्रत्येक विद्याथ्र्याने लाभ घेणो आवश्यक आहे. फेस्टिवलमुळे विद्याथ्यार्ंच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो. अशा प्रकारचे महोत्सव हे केवळ विद्याथ्र्यांना पाठबळ देण्यासाठी तसेच कलेची जोपासना करु न त्यांची जडण-घडण करण्यासाठी आयोजित केले जातात असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी अशोक फळणीकर यांनी केले आहे.
येथील पीएनपी संकुलात आयोजित केलेल्या रायगड विभागीय युथ फेस्टिवल कार्यकमाच्या उद्घाटन प्रसंगी फळणीकर बोलत होते. यावेळी पीएनपी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गणोश अग्नीहोत्नी, जे.एस.एम.कॉलेजचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, रायगड जिल्हा सांस्कृतिक विभाग समन्वयक सुनिल पाटील, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक मृदुल निळे, पीएनपी कॉलेजच्या उपप्राचार्य संजीवनी नाईक, एम.बी.ए कॉलेजचे प्राचार्य अनुज मिश्र, लक्ष्मी शालिनी कॉलेजचे प्राचार्य एम.पी.भगत, अॅड.दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या उपप्राचार्य अॅड. नीलम हजारे, बी.एड् कॉलेजच्या प्राचार्या रुतुषा पाटील, उंच माझा झोका फेम राहुल वैद्य, पीएनपी कॉलेजच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रगती म्हात्ने, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व अन्य मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पीएनपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणोश अग्नीहोत्नी यांनी भूषविले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, युथ फेस्टिवलच्या माध्यमातून विद्याथ्र्यांमध्ये आनंदपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी पीएनपी कॉलेज नेहमीच सज्ज असेल. या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा व उज्वल भवितव्याकडे वाटचाल करावी. जेएसएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले, पुर्वी केवळ विद्यापीठात युथ फेस्टिवल असल्याने रायगड जिल्ह्यातील विद्याथ्र्याना विशेष संधी उपलब्ध झाल्या नाहीत. परंतु आता विभागीय स्पर्धांमुळे जिल्ह्यातील विद्याथ्यांचा विद्यापीठातील सहभाग नक्कीच वाढला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्याथ्र्याचे कौशल्य युथ फेस्टिवलच्या माध्यमाने विकसित होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्ह्याचे समन्वयक सांस्कृतिक विभाग सुनिल पाटील यांनी केले तर प्रा. एकता मौर्य यांनी आभार मानले.
4कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पीएनपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणोश अग्नीहोत्नी यांनी भूषविले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, युथ फेस्टिवलच्या माध्यमातून विद्याथ्र्यांमध्ये आनंदपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी पीएनपी कॉलेज नेहमीच सज्ज असेल.
4युथ फेस्टिवलमधून रायगड जिल्ह्यातील विद्याथ्र्यानाही कला क्षेत्नात भरीव कामगिरी करण्याची संधी लाभणार आहे. या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा व उज्वल भवितव्याकडे वाटचाल करावी.जेएसएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले , पूर्वी केवळ विद्यापीठात युथ फेस्टिवल व्हायचे आता स्वरुप बदलले.