शेतकरी संघटनेचे 'गाजर वाटा' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 05:48 PM2017-02-17T17:48:38+5:302017-02-17T17:48:38+5:30

निवडणूक प्रचारांमध्ये ‘गाजर’ दाखवणाºया सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने शुक्रवारी स्थानीक जनता भाजी बाजारात ‘गाजर वाटा’ आंदोलन केले.

The 'carrot contribution' movement of the farmers' association | शेतकरी संघटनेचे 'गाजर वाटा' आंदोलन

शेतकरी संघटनेचे 'गाजर वाटा' आंदोलन

Next

ऑनलाइन लोकमत

अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध : नागरिकांना दिली फुकटात गाजरं
अकोला : शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा देऊन शेतमालाचे भाव पाडणे, शेतकऱ््यांची संपूर्ण कर्जमुक्ती,मराठा आरक्षण,मुस्लीम आरक्षण,धनगर आरक्षण या विषयांवर आश्वासने देऊन प्रत्यक्ष कृतीच्या नावावर निवडणूक प्रचारांमध्ये ह्यगाजरह्ण दाखवणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने शुक्रवारी स्थानीक जनता भाजी बाजारात ह्यगाजर वाटाह्ण आंदोलन केले.
अकोल्यात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेच्या पृष्ठभूमीवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करून सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. यावेळी लोकांनीही ही गाजरं घेण्यासाठी गर्दी केली होती. सरकार आणि मुख्यमंत्री शेतकरी आणि लोकांना फक्त विकासाच्या नावानं लोकांना गाजर देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अवघ्या २० मिनिटांच्या आंदोलनात सरकार च्या पोकळ आश्वासनांचा ह्यगाजर हलवाह्ण या आंदोलनातून शेकडो लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला. गनिमि काव्याने पार पडलेल्या या आंदोलनाची शहरात सर्वत्र चर्चा होती. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांची धरपकड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा असल्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र पोलीसांना कोणताही थांगपत्ता लागू न देता गनिमीकाव्याने हे आंदोलन केले. आंदोलन झाल्यानंतर भाजी बाजाात पोहोचलेल्या पोलीसांनी संघटनेच्या अविनाश नाकट, विलास ताथोड, डाँ. निलेश पाटील, धनंजय मिश्रा या कार्यकर्त्यांना अटक केली. यावेळी संतप्त झालेल्या पोलीसांनी बाजार बंद पाडण्याचाही प्रयत्न केला.

Web Title: The 'carrot contribution' movement of the farmers' association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.