आरक्षणाची जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नाही, वावोशी येथील सभेत खासदार संभाजी राजेंचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:42 AM2021-10-27T06:42:57+5:302021-10-27T06:43:22+5:30
Sambhaji Raje : मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून खासदार आहे, मी भाजपाचा असतो तर मला संसदेत आरक्षणासंदर्भात बोलण्याची संधी मिळाली असती, पण मला बोलू दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
वावोशी : मराठा आरक्षणासदर्भात समाज बांधवांनी रान उठवले होते. जवळपास ५८ मुक मोर्चे देखील काढले, मात्र उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर लगेच सर्व सनमवयकाना एकत्र करत राज्यात पुन्हा आरक्षणाची क्रांती उठविण्यासाठी संवाद यात्रा काढली आहे. सरकारच्या हातातून अजून ही वेळ गेली नसून जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नसल्याचा इशारा खासदार संभाजी राजे भोसले यांनी दिला आहे.
रायगड जिल्ह्यातून सुरु झालेल्या संवाद यात्रेतील वावोशी येथील सभेते ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या वेळी देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होते, त्यानंतर आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, आधीच्या मुख्यमंत्र्यानी जे केले तेच आता राज्य सरकार करीत आहे. एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. मी भाजपच्या कोट्यातून झालेला खासदार आहे, म्हणून माझ्यावर भाजपाचा लेबल लावला आहे.
मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून खासदार आहे, मी भाजपाचा असतो तर मला संसदेत आरक्षणासंदर्भात बोलण्याची संधी मिळाली असती, पण मला बोलू दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठ्यांची उपेक्षाच
वसतीगृहासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळातून १ हजार कोटी द्या, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळेल, आरक्षणामध्ये बलिदान दिले त्यांच्या नातेवाईकाला नोकरी द्या, त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, सारथी शिक्षण संस्थेला मदत करा, या सारख्या छोट्या मागण्या आहेत. त्यांचाही विचार सरकारकडून पूर्ण होत नसल्याने ही संवाद यात्रा काढल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.