पत्नीचे शीर हातात घेऊन क्रूरकर्मा रस्त्यात फिरला

By admin | Published: October 10, 2015 06:01 AM2015-10-10T06:01:39+5:302015-10-10T06:01:39+5:30

जावयाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्यानंतर धडावेगळे केलेले तिचे शिर आणि रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन भरदिवसा रस्त्यावर फिरणाऱ्या

Carrying his wife's head in a ruthless street | पत्नीचे शीर हातात घेऊन क्रूरकर्मा रस्त्यात फिरला

पत्नीचे शीर हातात घेऊन क्रूरकर्मा रस्त्यात फिरला

Next

पुणे : जावयाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्यानंतर धडावेगळे केलेले तिचे शिर आणि रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन भरदिवसा रस्त्यावर फिरणाऱ्या क्रूरकर्म्यास पोलिसांनी अटक केली. कात्रज येथील सुखसागर नगरमध्ये शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
गेल्या २० वर्षांपासून ओसवाल प्लॉटवर रखवालदार म्हणून काम करणाऱ्या रामचंद्र सेऊ चव्हाण (५३) याला दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्याच्या दोन मुलींची लग्न झालेली असून एक मुलगी गुलबर्गा येथे तर दुसरी मुलगी मुंबई येथे असते. तर राजेश आणि उमेश ही मुले त्यांच्यासोबतच राहतात. हे सर्व जण ओसवाल प्लॉटवर रहात होते. तो मूळचा कर्नाटकमधील गुलबर्गा येथील असून गेली चाळीस वर्ष तो पुण्यात राहतो. पत्नी तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत रामचंद्रची नेहमीच भांडणे होत असे. शुक्रवारी सकाळी त्याची दोन्ही मुले कामावर गेली. त्यावेळी घरात रामचंद्र याची पत्नी सोनाबाई (४५) तसेच राजेशची पत्नी सुनीता आणि त्यांची दोन लहान मुले होती. जावयाशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरुन चिडलेल्या रामचंद्रने सुनेसह नातवंडांना घरात कोंडले. दाराला बाहेरून कुलूप लावले. अंगणातच त्याने सोनाबाई हिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घातला, अशी माहिती परिमंडल दोनचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली.
सोनाबाईचे शीर घेऊन रामचंद्र गजबजलेल्या रस्त्याने पोलीस चौकीकडे जात होता. अंगावर काटा आणणारे हे दृश्य पाहून नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तर एका दुचाकीस्वाराने राजेश सोसायटी परिसरात वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलीस व्ही. के. कुमकर, डी. एन. जगताप आणि भालचंद्र तंवर यांना या प्रकाराची माहिती दिली. (प्रतिनिधी)

क्रूरतेची चित्रफीत व्हायरल
पत्नीचा खून केल्यानंतर रामचंद्र हातात शीर आणि कुऱ्हाड घेऊन जात असताना रस्त्याने जाणाऱ्या काही तरुणांनी मोबाईलमधून त्याचे चित्रीकरण केले. काही वेळातच ही चित्रफीत व्हॉट्सअ‍ॅपवरुन वाऱ्यासारखी पसरली.

Web Title: Carrying his wife's head in a ruthless street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.