बच्चे कंपनीवर कार्टून फीव्हर
By Admin | Published: May 18, 2016 01:46 AM2016-05-18T01:46:06+5:302016-05-18T01:46:06+5:30
सध्या सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत घराघरांमध्ये कुठे छोटा भीम, कुठे डोरेमॉन, कुठे निंजा हतोडी, तर कुठे मोटू-पतलू आदी कार्टून मालिका सुरू असल्याचे पाहावयास मिळते
रहाटणी : सध्या सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत घराघरांमध्ये कुठे छोटा भीम, कुठे डोरेमॉन, कुठे निंजा हतोडी, तर कुठे मोटू-पतलू आदी कार्टून मालिका सुरू असल्याचे पाहावयास मिळते.
शाळा सुरू झाल्यावर या मालिका पहावयास मिळत नाही असा भाग नाही; परंतु अभ्यासाचा व्याप जसजसा वाढत जातो तसतसा वेळ मिळत नसल्याने आपसूकच टीव्ही पाहण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात चढलेला कार्टून फीवर हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणून आहे तितके दिवस कार्टून पाहण्याची मजा लुटून घेण्यात लहान मुले व्यस्त झाली आहे.
जवळपास १0 वर्षांपासून गुन्हेगारांचा शोध लावणारी सीआयडी ही मालिका आवडीने पाहिली जाते. परंतु या मालिकेने आपला आता छोटा प्रेक्षकवर्गही तयार केला आहे. लहान मुलांनाही ती पाहण्याची आवड लागली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना अभ्यासातून वेळ मिळत नाही. (वार्ताहर)
आॅगी अँण्ड द कॉक्रोचेसची धूम
धम्माल विनोदी कार्टून मालिकांमध्ये आणखी आवडती मालिका म्हणजे आॅगी अँण्ड द कॉक्रोचेस. चार ते पाच वर्षांची मुले या कार्टूनची फॅन आहेत. डोके बाजूला ठेवून ही मालिका पाहावी लागते. याच पठडीतली टॉम अॅण्ड जेरी ही मालिका खूप जुनी असली, तरी आजही खूप प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे मोठी माणसेही आवर्जून ही मालिका बघत असतात. या मालिकांमध्ये बुद्धिवर्धक काहीही नसते. आॅगीला सतत त्रास देणारे कॉक्रोचेस मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत शाहरुख आणि सनी देओलचे आवाज खूप लोकप्रिय झाले आहेत.