सामनातील 'ते' व्यंगचित्र सदर कायमचे बंद?

By admin | Published: October 2, 2016 08:48 AM2016-10-02T08:48:14+5:302016-10-02T13:51:43+5:30

शिवसेनेच्या ह्यसामनाह्ण या मुखपत्रात मराठा समाजाच्या मोर्चाशी संबंधित व्यंगचित्र छापल्यानंतर झालेलं वादंग पाहता 'सामना'तून हसोबा प्रसन्न गायब झाले आहे.

'The' cartoon of the match is closed forever? | सामनातील 'ते' व्यंगचित्र सदर कायमचे बंद?

सामनातील 'ते' व्यंगचित्र सदर कायमचे बंद?

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०२ : शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात मराठा समाजाच्या मोर्चाशी संबंधित व्यंगचित्र छापल्यानंतर झालेलं वादंग पाहता 'सामना'तून हसोबा प्रसन्न गायब झाले आहे. आजच्या सामनाच्या पुरवणीत हसोबा प्रसन्न हे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्या व्यंगचित्राचे सदर प्रसिद्ध झालेल नाही. आता त्यावर कायम बंदी केली आहे? की हंगामी हे कळण्यास पुढील काही दिवस तरी वाट पाहवी लागणार हे नक्की.

गेल्या रविवारी सामाना मध्ये आलेल्या व्यंगचित्रावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने अनेक ठिकाणी वाद झाला होता. सामनाच्या अंकाची होळीही करण्यात आली होती. त्यांनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काल जाहीर माफी देखिल मागावी लागली. पक्षप्रमुख, शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आणि सामनाचा संपादक म्हणून मी या व्यंगचित्राबाबत माता-भगिनींची माफी मागतो,ह्ण असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: 'The' cartoon of the match is closed forever?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.