व्यंगचित्राचे पडसाद - बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By Admin | Published: September 27, 2016 11:39 PM2016-09-27T23:39:50+5:302016-09-27T23:39:50+5:30

सामना वर्तमानपत्रात आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी, जिल्ह्यातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाचा निषेध करून राजीनामे दिले आहेत

Cartoon rages - resignation of Shiv Sena office bearers of Buldhana district | व्यंगचित्राचे पडसाद - बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

व्यंगचित्राचे पडसाद - बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. २७ : सामना वर्तमानपत्रात आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी, जिल्ह्यातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाचा निषेध करून राजीनामे दिले आहेत. चिखलीत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहीत खेडेकर व शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेले कपिल खेडेकर या खेडेकर बंधुंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनेत विविध पदांवर व शिवसैनिक म्हणून कार्यरत मराठा समाजातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले आहे.

याच अंतर्गत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहीत खेडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर कपिल खेडेकर यांनी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत क्रांतीकारी निषेध नोंदविला. खेडेकर बंधुंच्या या निर्णयाने शिवसेनेत खळबळ उडाली असून मराठा समाजामध्ये या भूमिकेचे जोरदार स्वागत होत आहे. 

मेहकर :  वृत्तपत्रामध्ये आलेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मेहकर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजय जाधव यांनी यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नगरसेवक पदाचा राजीनामा पाठविला आहे. तसेच शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे यांनीही शिवसेनेच्या पदाचा राजीनामा पाठविला आहे.

लोणार : तालुक्यात गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेची धुरा सक्षमपणे सांभाळणारे तालुका शिवसेना प्रमुख प्रा.बळीराम मापारीसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवकुमार तेजनकर, पं.स.सदस्य मनोज तांबीले, पुंजाराम दहातोंडे,  जि.प.सदस्या सुलताने या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठविले आहेत.

 बुलडाणा : बुलडाणा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक हेमंत खेडेकर यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. व्यंगचित्रामुळे आपल्या भावना दुखावल्याचे त्यांनी सांगितले आहे.

खामगाव : घाटाखालील तालुक्यांमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.
यासोबतच उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, नांदूरा तालुका प्रमुख बाळासाहेब धोरण, उप तालुका प्रमुख सुनील जुनारे, वडनेरचे सर्कल प्रमुख संतोष बिजवे, मलकापूरचे युवा तालुका प्रमुख दीपक जवरे यांनीही राजीनामे दिले आहेत.

Web Title: Cartoon rages - resignation of Shiv Sena office bearers of Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.