कुंचल्यातून उतरवा कार्टूनच्या स्मितरेषा!

By admin | Published: July 26, 2016 05:48 AM2016-07-26T05:48:30+5:302016-07-26T05:48:30+5:30

माणसांच्या मनामनात कार्टूनला स्थान आहे. पण जगण्याच्या रहाटगाड्यात आपल्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटवू शकणाऱ्या व्यंगचित्रांना हक्काचा कोपरा कुठं आहे?

Cartoon smile! | कुंचल्यातून उतरवा कार्टूनच्या स्मितरेषा!

कुंचल्यातून उतरवा कार्टूनच्या स्मितरेषा!

Next

कट्टा : लोकमतचे आॅनलाइन व्यासपीठ

मुंबई : माणसांच्या मनामनात कार्टूनला स्थान आहे. पण जगण्याच्या रहाटगाड्यात आपल्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटवू शकणाऱ्या व्यंगचित्रांना हक्काचा कोपरा कुठं आहे? हक्काचा कार्टून कट्टा देत आॅनलाइन लोकमतने त्यावर नामी तोडगा काढला आहे. व्यंगचित्र ही अशी एक चीज आहे की कधी ती सातमजली गडगडायला लावते, तर कधी दोन-तीन मजली खुसखुस निर्माण करते. एखादं व्यंगचित्र तळमजल्यावरचं मंदसं स्मित जमवून जाते. ...तर उचला तुमचा ब्रश किंवा पेन-पेन्सिल आणि काढा या विषयावरचं एखादं बोलकं व्यंगचित्र आणि पाठवा onlinelokmat@gmail.com वर !

हक्काचं व्यासपीठ अन् दाद
विजेत्यांना हक्काचं व्यासपीठ तर मिळेलच, पण त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे लोकमतमधून प्रसिध्दी मिळून हजारोंच्या संख्येनं हशा आणि टाळयÞांची दादही मिळेल.
स्पर्धा सोप्पी आहे.
तुम्ही एवढंच करायचं. सोबत दिलेल्या विषयावर व्यंगचित्र काढून, स्कॅन करून खालील इमेल आयडीवर पाठवायचं.

विषय आहेत !
- नवज्योतिसंग सिद्धूचा भाजपाला रामराम. आपच्या वाटेवर!
- सिग्नल- नियम की नियमभंगाची जागा?/ झेब्रा क्र ॉसिंग - दिल्लीत तर थ्री डी झेब्रा क्र ॉसिंग
- भाजीपाला नियमाच्या कचाट्यातून मुक्त
- दोन कोटी झाडे लावण्याची मोहीम

यात सहभागी होण्याच्या अटीही जाचक नाहीत !
- लोकमत समूहाच्या कर्मचाऱ्यांसाठी ही स्पर्धा नाही.
- व्यंगचित्र साधारणत: पाच इंच रूंद आणि तीन इंच उभं हवं.
- रंगीत चित्र चालेल, पण काळयÞा- पांढ-यात विनोद जास्त खुलतो. खरं ना?
- तुम्ही एकदा चित्रं पाठवलंत की ती लोकमतची स्वामित्त्वाची धन होईल.
- अन्यत्र प्रसिध्द झालेलं व्यंगचित्र इथं धाडू नये.

आमचा इमेल आयडी :  onlinelokmat@gmail.com
लोकजागराच्या भाषेत सांगायचे तर बघताय काय सामील व्हा. संधी दारात चालून आली आहे. तिचे सोने करा.

Web Title: Cartoon smile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.