नालासोपाऱ्याचा कैलास चमकला
By admin | Published: April 24, 2017 02:56 AM2017-04-24T02:56:30+5:302017-04-24T02:56:30+5:30
भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या तीन देशांच्या संघाचा सहभाग असलेल्या व बांगलादेश क्रिकेट असोसिएशन आॅफ फिजिकली चॅलेंज्ड आयोजीत
सुनील घरत / पारोळ
भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या तीन देशांच्या संघाचा सहभाग असलेल्या व बांगलादेश क्रिकेट असोसिएशन आॅफ फिजिकली चॅलेंज्ड आयोजीत, दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद नालासोपारा येथील क्रिकेटपटू व कर्णधार कैलास घाणेकर याने भारताला मिळवून दिले.
बांगलादेश येथे १५ ते २० एप्रिल दरम्यान हे सामने खेळविण्यात आले होते. यातील पहिला सामना हा श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात झाला, त्यात श्रीलंका संघाला बांगलादेश ने ११० धावानी पराभूत केले. दुसऱ्या लढतीत भारताने फक्त १ गडी गमावून लंकेवर विजय मिळवला.
दोन्ही सामन्यात पराभव झाल्याने श्रीलंका मालिकेतून बाद झाले. अंतिम सामन्यासाठी सज्ज असलेल्या भारत आणि बांगलादेश यातील सामना रात्री पडलेल्या पावसामुळे खेळविता आला नाही. तो रद्द झाला आणि दोन्ही संघाना पंचानी संयुक्त विजेते घोषित केले. बक्षीस समारंभाला बांगलादेशचे क्र ीडा मंत्री हसन रॉय आणि माजी कर्णधार मोहोम्मद अक्र म उपस्थित होते. (प्रतिनिधी)