‘बीएचआर’प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

By admin | Published: May 3, 2015 02:12 AM2015-05-03T02:12:54+5:302015-05-03T02:12:54+5:30

आरोपींची जळगाव कारागृहात रवानगी, अकोला कार्यालयासोबत जमीनही जप्त.

In the case of 'BHR', the judicial custody of the accused | ‘बीएचआर’प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

‘बीएचआर’प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

Next

अकोला : 'बीएचआर' बँकेत ठेवीवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवत ठेवीदारांना लाखो रुपयांनी गंडविल्या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी बीएचआर बँकेच्या अकोला कार्यालयासोबतच मोहता मिल परिसरातील बँकेची जमीन व एक कार जप्त केली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. सर्व अटक आरोपींना जळगाव कारागृहात पाठविण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, जुने शहरातील डाबकी रोडस्थित आश्रयनगर रहिवासी सेवानवृत्त सैनिक गजानन रामसा धामंदे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी जळगाव येथील प्रमोद भाईचंद रायसोनी सोबतच दिलीप क्रांतीलाल चोरडिया, मोतीलाल ओंकार जिरी, सुरजमल बभुतमल जैन, दादा रामचंद्र पाटील, भगवान संपत माळी, राजाराम काशीनाथ कोळी, भगवान हीरामण वाघ, डॉ. हितेंद्र यशवंत महाजन, इंद्रकुमार आत्माराम लालवानी, शेख रहजान शेख अब्दुल नबी मन्यार, ललि ताबाई राजू सोनवणे, प्रतिभाबाई मोतीलाल जिरी, सुकलाल शहादूर माळी, यशवंत ओंकार जिरी यांच्याविरुद्ध कलम ४0६, ४२0, १२0 (ब) तसेच महाराष्ट्र निवेशक हितसंबंध सुरक्षा अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी जळगाव कारागृहात असल्याने शहर कोतवाली पोलिसांनी अकोला व जळगाव येथील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी दोन महिला आरोपींना सोडून इतर १३ आरोपींना जळगाव कारागृहातून ताब्यात घेतले होते.
न्यायालयाने सर्व आरोपींना २ मे पर्यंंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, तपास पथकाने जळगाव येथे जाऊन बीएचआर संस्थेच्या जळगाव कार्यालयाला सील करून ८५ लाख रुपयांचे २२ धनादेश जप्त केले होते. शनिवार, २ मे रोजी न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, आरोपींना जळगाव येथील कारागृहात पाठविण्यात येणार आहे.

Web Title: In the case of 'BHR', the judicial custody of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.