बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणात रियाझ सिद्दिकीला जन्मठेप, टाडा कोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 02:08 PM2017-09-12T14:08:45+5:302017-09-12T14:08:45+5:30
प्रदीप जैन हत्येप्रकरणी रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टाडा न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष न्यायालयात रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या हत्येप्रकरणी यापूर्वीच विशेष न्यायालयाने, अबू सालेम व त्याचा ड्रायव्हर मोहम्मद मेहंदी हसन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मुंबई, दि. 12 - प्रदीप जैन हत्येप्रकरणी रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टाडा न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष न्यायालयात रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या हत्येप्रकरणी यापूर्वीच विशेष न्यायालयाने, अबू सालेम व त्याचा ड्रायव्हर मोहम्मद मेहंदी हसन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
पहिल्यांदा रियाज, अबू सालेम व हसन मेहेंदी यांच्यावरील खटला एकत्रितपणेच सुरू होता. परंतु सिद्दिकीने खरं उघड करण्याची तयारी दर्शविल्यानंतर तसा जबाबही नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात रियाझ सिद्दिकीला ‘माफीचा साक्षीदार’ करण्यात आले होते. मात्र काही महिन्यांतच त्याने जबाब मागे घेतल्यानं तो फितूर असल्याचे सरकारी वकिलांनी जाहीर केले. या कारणास्तव रियाजवर स्वतंत्रपणे खटला चालविण्यात आला होता.
हे प्रकरण दुर्मीळ नसल्याने रियाजला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकिलांनी विशेष टाडा न्यायालयाला केली होती. अखेर त्याला टाडा न्यायालयानं मान्यता दिली आहे. सिद्दिकीवर हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने, या गुन्ह्यांतर्गत दोषीला फाशी किंवा जन्मठेप होऊ शकते म्हणून न्यायालयाने सिद्दिकीला त्याची बाजू मांडण्यास सांगितले होते.
कोणी केली प्रदीप जैन यांची हत्या ?
1995मध्ये विकासक प्रदीप जैन यांची संपत्तीवरून हत्या करण्यात आली. हत्येप्रकरणी सिद्दीकीला दोषी ठरविताना, न्यायालयाने म्हटले की, अबू सालेम, मोहम्मद मेहेंदी हसन, सुभाष बिंद, शेखर कदम व दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस यांच्यासह रियाज सिद्दfकी विकासकांच्या मनात दहशत निर्माण करायची होती, तसेच जैन भावंडांनी ‘कोल डोंगरी प्रापर्टी’वरील त्यांचे अधिकार सोडावेत, यासाठी ही हत्या करण्यात आली. त्यामुळे या लोकांना मोठा आर्थिक फायदा होणार होता. सरकारी वकिलांनी रियाज सिद्दfकीविरुद्ध भक्कम पुरावे सादर केले आहेत, तसेच जैन याच्या हत्येच्या कटात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचेही सरकारी वकिलांनी सिद्ध केले, असेही न्यायालयाने म्हटले.