महिलेला जिवंत जाळल्या प्रकरणी तिघाजणांना जन्मठेपेची शिक्षा
By admin | Published: July 22, 2016 06:54 PM2016-07-22T18:54:17+5:302016-07-22T18:54:17+5:30
जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा जणांनी चाळीस वर्षीय महिलेच्या अंगावर रॉकेल टाकुन जिवंत जाळल्या प्रकरणी दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायधीश एस. व्ही. हंडे यांनी तीन
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 20 - जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा जणांनी चाळीस वर्षीय महिलेच्या अंगावर रॉकेल टाकुन जिवंत जाळल्या प्रकरणी दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायधीश एस. व्ही. हंडे यांनी तीन आरोपींना जन्मठेपेची ( अजन्म कारावास) शिक्षा व प्रत्येकी पाचशे रुपायांंचा दंड ठोठावला.
केज तालुक्यातील उमरी येथील वर्षा गिणा मुळे (वय ४० वर्षे ) या १९ एप्रील २०१५ रोजी पहाटे तीन वाजता पीठाची गिरणी चालु करण्यासाठी उठल्या. त्यावेळेसच गावातीलच भारत वामन मुळे, धनराज वामन मुळे व मनिषा संपती मुळे यांनी वर्षाला घराबाहेर बोलावले. त्या ठिकाणी धनराज व भारत रॉकेलचा कॅन घेऊन उभा होते. आता तुला जिवेच मारतो म्हणुन भारतने वर्षाच्या अंगावर रॉकेल टाकले. धनराज ने काडी पेटवुन दिले. यात ती ८८ टक्के भाजली होती. तिला केजच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठवले. उपचारा दरम्याण जखमी महीलेचा व तिचा मुलगा निखीलचा मृत्युपुर्व जवाब पोलिस व कार्यकारी दंडाधिका-यासमोर नोंदवला. या जवाबावरुन केज पोलिसात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. एस. चव्हाण यांनी करुन दोषारोपपत्र अंबाजोगाईचे जिल्हा व सत्र न्यायधीस एस. व्ही. हंडे यांच्यासमोर सुनावणीसाठी आले. सरकार पक्षाच्यावतीने नऊ साक्षीदार तपासले. यात मुत्युपुर्व जवाब व मयत महीलेच्या मुलाचा जवाब ग्राह्य धरुन न्या. एस. व्ही. हंडे यांनी भारत वामन मुळे, धनराज वामन मुळे व मनिषा संपती मुळे या तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची (अजन्म कारावास) शिक्षा व प्रत्येकी पाचशे रुपायांचा दंड ठोठावला. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. लक्ष्मन फड यांनी काम पाहीले त्यांना अॅड. आर. एस. राख यांनी सहकार्य केले.