आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल

By admin | Published: June 13, 2017 01:33 PM2017-06-13T13:33:19+5:302017-06-13T15:34:00+5:30

बार्शी बाजार समितीचे तत्कालीन सभापती तसंच आमदार दिलीप सोपल, उपसभापती, सचिव, संचालक मंडळ आणि कामगारांसह एकुण 125 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.

A case has been registered against MLA Dilip Sopal | आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल

Next

आॅनलाइन लोकमत

बार्शी, दि. 13 - बार्शी बाजार समितीचे तत्कालीन सभापती तसंच आमदार दिलीप सोपल, उपसभापती, सचिव, संचालक मंडळ आणि कामगारांसह एकुण 125 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. बार्शी पोलिस स्टेशमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एप्रिल १५ ते मार्च १६ या कालावधीत व्यापारी अतिक्रमण, नियमबाह्य कामगार भरती, बाजार समिती निधी अपहार, शासकीय दस्तऐवजामध्ये बेकायदेशीर बदल करणं, या मुद्यांच्या आधारे लाखो रूपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी ही कारवाई झाली आहे. 

याबत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे अधिक माहिती देताना म्हणाले की, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निधीचा अपहार करणं, जमिनीतील वसूल भाड्यामध्ये अपहार करणं, बाजार समितीत तसंच जमिनीवर अतिक्रमण करणं, नियमबाह्य हंगामी व रोजनदारी भरती करणं, चुकीच्या दिवशी व गैरहजर कालावधीत कर्मचारी यांना वेतन अदा करणं, तसंच शासकीय दस्तऐवजात बेकायदेशीर बदल करणं असा एकूण १.५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था सोलापूर विष्णू डोके यांनी दिलेल्या फियार्दीवरून बार्शी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे. याप्रकरणचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावाले हे करीत आहेत.

दरम्यान आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचं वृत्त समजताच  बाशीर्तील बाजार समितीसह सोमवार पेठेसह शहरातील अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली. दरम्यान शहर व तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

Web Title: A case has been registered against MLA Dilip Sopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.