जळगावच्या मनसे नगरसेवकाची सादरे प्रकरणी चौकशी
By admin | Published: November 19, 2015 01:55 AM2015-11-19T01:55:55+5:302015-11-19T01:55:55+5:30
जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी, बुधवारी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी जळगावमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
नाशिक : जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी, बुधवारी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी जळगावमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ललित कोल्हे यांची तीन तास चौकशी केली़
सीडीआयडीने यापूर्वी वाळू ठेकेदार राजेश मिश्रा, रवींद्र
चौधरी यांची चौकशी करून
जबाब घेतला आहे़ कोल्हे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात हजर झाले. अधिकाऱ्यांनी
सुमारे दोनशे ते अडीचशे वेगवेगळे प्रश्न विचारून कोल्हेंचा जबाब नोंदवून घेतला़ आत्महत्या प्रकरणातील संशयित सागर
चौधरी, त्याचा वाळू व्यवसायातील भागीदार रवींद्र चौधरी हे
पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी गेले असताना, सादरे यांनी कोल्हेंच्या मोबाइलवर फोन केला होता़
पोलीस निरीक्षक सादरे यांचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून कोल्हे यांनी ते रेकॉर्डिंग सागर व रवींद्र चौधरी यांना दिले होते़ सागरने हे संभाषण वकिलामार्फत न्यायालयास अटकपूर्व जामीन अर्जाच्या वेळी सादर केले आहे़
सीआयडीचे अधीक्षक प्रदीप देशपांडे व पोलीस निरीक्षक के.
डी़ पाटील यांनी कोल्हे यांनी
सादरे यांचा रेकॉर्ड केलेला फोन, तसेच इतर बाबींबाबत चौकशी केली़ त्यानंतर त्यांचा लेखी जबाब घेण्यात आला़
आईची तब्येत खराब असल्याचे कारण सांगून, लवकर जाऊ देण्याची विनंती त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीआयडीचे
पथक शुक्रवारी जळगावला जाणार आहे़ (प्रतिनिधी)