गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
By admin | Published: September 3, 2016 04:18 PM2016-09-03T16:18:57+5:302016-09-03T16:37:58+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या खुल्या चौकशीनंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात तब्बल 6434 पानांचे दोषारोपपत्र सादर केले
Next
>- ऑनलाइन लोकमत
घोडाझरी कालव्यातील निकृष्ट कामांबाबत 6434 पानांचे दोषारोपपत्र
मुख्य अभियंत्यासह पाच अधिकारी व कंत्रटदारांचा समावेश
नागपूर, दि. 3 - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या खुल्या चौकशीनंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालव्यातील निविदा प्रक्रिया व बांधकामात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात शनिवारी पोलिसांनी न्यायालयात तब्बल 6434 पानांचे दोषारोपपत्र सादर केले. इतकेच नव्हे तर तपासादरम्यान अधिक पुरावे मिळून आल्यास अथवा अधिक आरोपी निष्पन्न झाल्यास पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्याची तजवीजसुद्धा दोषारोपपत्रत ठेवण्यात आली आहे.
आरोपींमध्ये तत्कालीन पूर्वअर्हता मूल्यांकन समिती अध्यक्ष आणि मुख्य अभियंता गोसेखुर्द प्रकल्प नागपूर सोपान रामराव सूर्यवंशी, तत्कालीन पूर्वअर्हता मूल्यांकन समिती सदस्य सचिव आणि सध्या कार्यकारी अभियंता (नागपूर) असलेले रमेश डी. वर्धने, तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर रा. नागपूर, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास लांडगे रा. पुणो आणि कंत्रटदार एफ.ए. कन्स्ट्रक्शन मुंबईचे सक्रिय भागीदार निसार फतेह मोहम्मद अब्दुला खत्री रा. मुंबई यांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (अॅन्टी करप्शन ब्युरो) राज्यातील सिंचन प्रकल्पांची उघड चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ब्युरोचे महासंचालक यांनी विदर्भातील पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी चौकशी सुरु करण्याचे आदेश नागपूर कार्यालयाला दिले होते. त्यानुसार अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांना घोडाझरी शाखा कालवा कि.मी. 4.26क् ते 8.8क्क् मधील मातीकाम ‘कट अॅण्ड कव्हर’ या कामाची निविदा प्रक्रिया व बांधकाम संबंधाने उघड चौकशी केली. चौकशीअंती पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी 23 फेब्रुवारी 2क्16 रोजी आरोपी लोकसेवक व मे.एफ.ए. कन्स्ट्रक्शनचे सक्रिय भागीदार निसार फतेह मोहम्मद खत्री आणि इतर 4 भागीदार यांच्याविरुद्ध नागपूर शहर येथील सदर पोलीस स्टेशन येथे अप.क्र. 3175/2क्16 कलम 13(1) (क), (ड), सह 13 (2) ला.प्र.का 1988 व सह कलम 42क्, 465, 467, 468, 471, 1क्9, 12क् (ब) भां.द.वि.अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.