नालासोपारा स्फोटकांचे प्रकरण : औरंगाबादला एटीएसने एकाला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 05:00 AM2018-08-18T05:00:12+5:302018-08-18T05:00:50+5:30

नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शरद कळस्करच्या औरंगाबादेतील एका मित्राला कुंवारफल्लीतून ताब्यात घेतले आहे.

Case of Nalasopara explosives: ATS has taken possession of one person in Aurangabad | नालासोपारा स्फोटकांचे प्रकरण : औरंगाबादला एटीएसने एकाला घेतले ताब्यात

नालासोपारा स्फोटकांचे प्रकरण : औरंगाबादला एटीएसने एकाला घेतले ताब्यात

googlenewsNext

औरंगाबाद - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शरद कळस्करच्या औरंगाबादेतील एका मित्राला कुंवारफल्लीतून ताब्यात घेतले आहे. सचिन अणदुरे असे त्याचे नाव असून, तो कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेतून सचिनला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी नेत असल्याचे अधिकाºयांनी त्याच्या नातेवाइकांना सांगितले. त्याच्यासोबत त्याचा भाऊही गेल्याचे सूत्रांकडून समजले. राज्यातील चार शहरांत बॉम्बस्फोट करण्याच्या उद्देशाने बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जमविणाºया आरोपींचा गत सप्ताहात एटीएसने पर्दाफाश केला होता. अटकेतील तीन जणांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील शरद कळस्कर याचा समावेश आहे.
कळसकरच्या चौकशीत त्याच्या जवळच्या मित्रांच्या यादीत सचिनचा समावेश असल्याचे एटीएसला समजले. सचिनही हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे त्याच्या फेसबुकवरील प्रोफाइल चित्रावरून दिसून आले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल, तर त्याला अटक केली जाईल; अन्यथा त्यास सोडून देऊ, असे एटीएसच्या अधिकाºयांनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजले. त्या वेळी त्याच्या भावाने मीसुद्धा तुमच्या सोबत येतो, असे म्हणून तोदेखील अधिकाºयांसोबत मुंबईला गेला. निराला बाजार येथील रेडिमेड कापड दुकानात तो काम करतो.
सचिनचे आई-वडील हयात नाहीत. तो पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह कुंवारफल्ली येथे राहतो. सचिन मे महिन्यात राजाबाजार, शहागंज परिसरात झालेल्या दंगलीच्या वेळी हिंदू वसाहतींतील घरांना संरक्षण देण्याची भाषा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Case of Nalasopara explosives: ATS has taken possession of one person in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.