प्रत्युषा आत्महत्या प्रकरणी राहुल राज विरोधात गुन्हा दाखल
By admin | Published: April 5, 2016 08:30 PM2016-04-05T20:30:38+5:302016-04-05T20:30:38+5:30
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आणि निर्माता राहुल राज सिंह विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आणि निर्माता राहुल राज सिंह विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुलवर प्रत्युषाला मारहाण, धमकावणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला आहे.
प्रत्युषाची आई सोमा यांनी बांगूर नगर पोलिसांना जो जबाब दिला त्या आधारावर कलम ३०६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत राहुल राज सिंहविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. छातीत दुखत असल्यामुळे राहुल चार एप्रिलपासून रुग्णालयात दाखल आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक होऊ शकते.
आतापर्यंत १२ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. राहुलमुळे प्रत्युषाला त्रास होत होता. एकदा राहुलने सर्वांसमक्ष तिच्यावर हात उचलला होता असे प्रत्युषाच्या मित्र-मैत्रिणींनी पोलिसांना सांगितले. एक एप्रिलला प्रत्युषाने गोरेगावमधील तिच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.