गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 08:29 PM2018-07-10T20:29:08+5:302018-07-10T20:31:52+5:30

दोन वर्ष ठेवले अनैतिक शरीरसंबंध  

A case of rape was registered against the detective officer | गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Next

नागपूर - सुरक्षा दलात काम करणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आणि लग्नाचे करण्याचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून तिच्यासोबत अनैतिक शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या गुप्तचर यंत्रणेतील एका एएसआयविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अमितकुमार शर्मा (वय - ३६) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी  गुप्तचर यंत्रणेत (आयबी) काम करतो. तो धनबाद, झारखंड येथील रहिवासी असून, सध्या दिल्लीत कार्यरत आहे. तक्रारदार पीडित तरुणी (वय - २६) मूळची सावनेरची आहे. ती राज्य सुरक्षा दल (एमएसएफ) काम करते. धनबाद येथे कार्यरत असताना तरुणीची तीन वर्षांपूर्वी शर्मासोबत ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शर्माने तिला चांगल्या नोकरीसोबत लग्नाचेही आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत शरीरसंबंध ठेवले. दोन वर्षांपूर्वी ती आपल्या गावी सावनेरला आली. ५ एप्रिल २०१६ रोजी नागपुरात आल्यानंतर ते दोघे सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल राजहंसमध्ये २०२ क्रमांकाच्या रूममध्ये थांबले. तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार शर्माने यावेळी तिला गुंगीचा पदार्थ खाऊ घातला आणि तिचा लैंगिक छळ केला. त्यानंतर, तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शरीरसंबंध ठेवू लागला. ५ एप्रिल २०१६ ते १५ मे २०१८ या कालावधीत त्यांच्यात वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर लग्नाचा विषय निघताच शर्मा तिला टाळू लागला. बदनामीची धमकी देऊ लागला. त्याने विश्वासघात केल्यामुळे तरुणीने गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. 

पोलिसांचा सावधगिरीने तपास 

प्रकरण संवेदनशील गुप्तचर यंत्रणेत (आयबी) कार्यरत असलेल्या संबंधित पोलिसांनी सखोल आणि सावधगिरीने चौकशी केली. त्यानंतर पीएसआय यू. एन. मडावी यांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, गुप्तचर यंत्रणेत कार्यरत व्यक्तींचा सामान्य नागरिकांशी फारसा संबंध येत नाही. ते गोपनीय आणि ओळख लपवूनच काम करतात. शर्माने कशी काय ओळख जाहीर केली, ती बाब पोलीस अधिकाऱ्यांनाही चक्रावून टाकणारी आहे. 

Web Title: A case of rape was registered against the detective officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.