‘केबीसी’च्या फरार संचालकांभोवती फास आवळणार
By admin | Published: August 6, 2014 01:47 AM2014-08-06T01:47:22+5:302014-08-06T01:47:22+5:30
भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्यावर ‘रेड कॉर्नर नोटीस’ बजावण्याबाबत न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे, अशी माहिती सूत्रंनी दिली.
Next
नाशिक : गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फ सवणूक करणारा केबीसीचा फरार झालेला प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्यावर ‘रेड कॉर्नर नोटीस’ बजावण्याबाबत न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे, अशी माहिती सूत्रंनी दिली.
पोलिसांनी न्यायालयाकडे याबाबत अर्ज केला होता. त्यानुसार अटक केलेल्या संचालकांच्या बँक लॉकर तपासणीबाबतही आज निर्णय अपेक्षित आहे. भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती सिंगापूरला फ रार झाले आहेत. पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
केबीसीने फसवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची संख्या सहा हजारांपेक्षा अधिक झाली आहे. फसवणुकीची रक्कम 17क् कोटींपेक्षा जास्त आहे. आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या संशयितांची 73 कोटींची स्थावर व बँकेतील मालमत्ता सील केली आहे. (प्रतिनिधी)