काजू कतली ‘आॅल टाईम फेवरिट', बंगाली मिठाई यंदा देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 11:44 AM2017-09-23T11:44:00+5:302017-09-23T11:47:20+5:30
सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम आहे. दसराही अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मिठाई खरेदीचीही लगबग सुरु आहे.
- अक्षय चोरगे
मुंबई - सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम आहे. दसराही अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मिठाई खरेदीचीही लगबग सुरु आहे. सध्या सर्वच प्रसिद्ध मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी उसळत आहे. बंगाली मिठाई यंदा देखील आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. बंगाली मिठाई पाठोपाठ विविध रेंजमधील काजू कतलीही खवय्यांच्या पसंतीस उतरत आहे. सध्याच्या नवरात्रौत्सवात बंगाली मिठाईची चव आवडीने घेतली जात आहे.
काजू कतली ‘आॅल टाईम फेवरिट’ असल्यामुळे सर्वाधिक पसंती काजू कतलीलाच आहे. त्यासोबतच मोतीचूर लड्डू, बाकरवड्या, सातारी कंदी पेढे, रसमलाई, मिष्टी दोई, खिर कोदम हे महाराष्ट्रीय आणि बंगाली पदार्थदेखील मुंबईकरांच्या जीभेवर सध्या रुंजी घालत आहेत. मिठाई आणि पेढ्यांच्या किंमती पाचशे रूपयांपासून आहेत. तर काजू कतली ८०० ते १५०० रूपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खास पश्चिम बंगाल वरून कारागिर मुंबईत दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मिठाई आणि पेढ्यांसह लाडू, बर्फी आणि कित्येक प्रकारच्या स्विट्सनाही मोठी मागणी आहे. त्यात प्रामुख्याने गुलाबजाम, जिलेबी, रसगुल्ला, चॉमचॉम या पदार्थांचा समावेश आहे.
खास बंगालमधून कारागीर
नवरात्रौत्सवात बंगाली मिठाई हा खवय्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. मुंबईत बंगाली लोकसंख्या वाढलेली आहे. बंगालींसह मराठी जनांना बंगाली मिठाई मनापासून आवडते. त्यामुळे बंगाली मिठार्इंची मागणी वाढत आहे. खास नवरात्रौत्सवासाठी नेहमीपेक्षा अधिक कारागीर कोलकाताहून आले आहेत. कारागिरांना नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागत आहे. मिष्टी दोई, नलेन गुडेर, खिर कोदम, चॉमचॉम, रसमलाई अशा पदार्थांना विशेष मागणी आहे. पदार्थांच्या किंमती मात्र स्थिर आहेत.
- चंचल चक्रवर्ती, बंगाली मिठाईच्या दुकानाचे मालक
बदाम कतली ७०० ते १२०० रूपये किलो
काजू कतली ६५० ते १५०० रूपये किलो
पेढे (रू. प्रति किलो)
मलाई पेढे ५००
कंदी पेढे ५०० ते ६००
पिस्ता पेढे ६०० ते७००
केशर पेढे ७००
बर्फी (रू. प्रति किलो)
साधी बर्फी ५००
चॉकलेट बर्फी ६००
आंबा बर्फी ६००
मलाई बर्फी ५४०
स्पेशल बर्फी ७००
गुलाब मलाई बर्फी ६००
अंबामलाई बर्फी ६४०
लाडू (रू. प्रति नग)
राजीगिºयाचे लाडू १५ ते २०
बेसन लाडू २२ नग
मोतीचुर लाडू २५
डिंक लाडू २४
मेथी लाडू २५
केशर लाडू २५
काजू लाडू ३०
बदाम लाडू ३०
तूपातला मेवा लाडू ३०
इतर स्वीट्स (रू. प्रति किलो)
बाकर वडी ३५०
मैसूरपाक ३४०
शंकरपाळे ३४०
मिक्स मिठाई ५०० ते ७००
ड्रायफ्रूट मिठाई ८०० ते १२००
बंगाली मिठाई आणि स्वीट्स (रू. प्रति नग)
रसगुल्ला १६
काचागुल्ला २२
खिर कोदम २४
चॉमचॉम २०
मलाई चॉमचॉम २३
क्रिम चॉमचॉम २८
मँगो चॉमचॉम २५
गुडेर ३०
रसमलाई २२
मोतीचूर लाडू ५७५ रूपये किलो
काजू लाडू ९२५ रूपये किलो
काजू कतली १०२५ रूपये किलो
बदाम कतली ११२५ रूपये किलो