अत्याचारग्रस्त विद्यार्थिनींच्या नातेवाईकांपुढे जात पंचायतीचा पेच!
By admin | Published: November 18, 2016 07:12 PM2016-11-18T19:12:57+5:302016-11-18T19:12:57+5:30
तालुक्यातील पाळा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या लैगिंक शोषणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत/अनिल गवई
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 18 - तालुक्यातील पाळा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या लैगिंक शोषणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या पीडित विद्यार्थींनीच्या कुटुंबीयांना जात पंचायतीचे पदाधिकारी भेट देत असून समाजात तक्रार देण्याची प्रथा नसल्याचे सांगत असल्याने पेच निर्माण झाला आहे.
खामगाव पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत दोन विद्यार्थींनींच्या लैगिंक शोषणाचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे दोन वेगवेगळ्या तक्रारींवरून मुख्य आरोपी इत्तुंसिंग पवार याच्यासह १७ आरोपींविरोधात कारवाईचा फास आवळण्यात आला. दरम्यान, राज्यभर गाजत असलेल्या या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान, नवनवीन सत्य उजेडात येत असतानाच, अत्याचार ग्रस्त विद्यार्थीनींच्या नातेवार्इंकांची जात पंचायतीकडून वेगळी चौकशी केली जात आहे. पोलिसात तक्रार देण्यापूर्वी जात पंचायतीसमोर सदर प्रकरण का आणले नाही?, आपल्या समाजात पोलिसात तक्रार करण्याची प्रथा नाही, यासह विविध प्रश्नांचा भडीमार केल्या जात असल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. याकरीता घटना उघडकीस आल्याच्या दिवसांपासून सातपुड्याच्या पर्वंत रांगेतील संबधीत समाजातील जात पंचायत पदाधिका-यांसह अमरावती जिल्ह्यातील जात पंचायतच्या काही पदाधिका-यांनी हलखेडा ता. मुक्ताईनगर येथे तळ ठोकल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
मुलींच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करीत, विविध प्रश्नांच्या भडीमारातून जात पंचायतीच्या पदाधिका-यांकडून अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या नातेवाईकांची रात्री उशीरापर्यंत झोप खराब केल्या जात असल्याचे वास्तव हलखेडा आदिवासी पाड्यात आहे. जात पंचायतच्या पदाधिका-यांच्या या कृत्यांमुळे अत्याचार पिडीत दोन्ही विद्यार्थींनीच्या नातेवाईकांचे जगणे मुश्किल झाल्याचीही चर्चा परिसरात होत आहे.
हलखेड्यातील आदिवासी बांधवांकडून सात्वन!
सातपुड्याच्या पर्वंत रांगेतील विविध आदिवासी पाड्यातील जात पंचायत पदाधिका-यांसह, अमरावती जिल्ह्यातील जात पंचायत पदाधिका-यांकडून पिडीत विद्यार्थींनीच्या नातेवार्इंकासमोर ‘पेच’ निर्माण केल्या जात असताना हलखेडा आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांकडून सात्वंन केल्या जात आहे. सोबतच त्यांना धीर दिल्या जात असल्याची माहितीही चौकशीत समोर आली आहे.
घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेच्या तक्रारीबाबत हलखेडा येथील आदिवासी बांधवांकडून अत्याचारग्रस्त विद्यार्थीनीच्या नातेवार्इंकांवर कोणताही दबाव नाही. या कुटुंबांचे आम्ही समुपदेशन करतोय. जात पंचायतीच्या पदाधिका-यांच्या दबावाबाबत आपणाला माहिती नाही. शासनाने अत्याचार ग्रस्त विद्यार्थीनींच्या कुटुंबियांना मदत करावी.
- बॅलीस्टरनी सती भोसले
माजी सरपंच, हलखेडा आदिवासी ग्राम.