बदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 02:30 PM2017-11-09T14:30:41+5:302017-11-09T14:31:01+5:30

बदाम समजून एरंडेलच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Castor seeds, almonds, and four children from Solapur were admitted to the hospital | बदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल 

बदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल 

Next

सोलापूर  : बदाम समजून एरंडेलच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्र ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली.
फरजान गुलाम मोहम्मद मदारी (वय ७), नर्गीस दिलशाद मदारी (वय ८), सोनी वरकत मदारी (वय ५), ज्योती गुलाम मोहम्मद मदारी (वय ६, सर्व रा. भोगाव) अशी उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची नावे आहेत.
बुधवारी दुपारी भोगाव येथील शेती गट नं. १३२ मध्ये वरील चौघां बालकांनी बदाम समजून नजरचुकीने एरंडीच्या बिया खाल्या. त्यामुळे सायंकाळी या सर्वांना त्रास होऊ लागल्याने पालकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Castor seeds, almonds, and four children from Solapur were admitted to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.