सरखेल कान्होजी आंग्रे नगरीत 19 व 20 फेब्रुवारी रोजी ‘मैफील’ ची पर्वणी

By Admin | Published: February 17, 2016 03:29 PM2016-02-17T15:29:40+5:302016-02-17T15:42:28+5:30

महेश काळे यांचे गायन, उस्ताद शाहीद परवेझ यांचे सुपुत्न शाकीर खान व विख्यात सारंगिये साबीर खान यांची सतार-सारंगी जुगलबंदी आणि लोकप्रिय गायिका सावनी शेंडे

The catch of 'Memphil' on February 19 and 20 in Sirkeel Kanhoji Angre | सरखेल कान्होजी आंग्रे नगरीत 19 व 20 फेब्रुवारी रोजी ‘मैफील’ ची पर्वणी

सरखेल कान्होजी आंग्रे नगरीत 19 व 20 फेब्रुवारी रोजी ‘मैफील’ ची पर्वणी

googlenewsNext
>जयंत धुळप, (अलिबाग)
दि. 17 - नाटय़ आणि संगीत प्रेमी वयोवृद्ध ज्येष्ठ पत्रकार भाऊ सिनकर यांच्या माध्यमातून तत्कालीन श्री सिद्धराज कलामंदिरांत होणार््य संगीत मैफीली आणि नाटके यांतून अलिबागकरामध्ये  निर्माण झालेली रसिकता आणि संगीता बाबतची आसक्ती पूढे हे श्री सिद्धराज कलामंदिर बंद झाल्यावर अपूर्ण राहू लागली. त्याच वेळी काही संगीत प्रेमी तरुणांनी एकत्र येवून व्यक्तीगत वर्गण्यांच्या माध्यमातून ,व्यक्तीगत ओळखींतून  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमीतकमी मानधनात, कोणताही व्यावसायीक दृष्टीकोन न ठेवता मुंबई-पुण्याच्या गायक कलाकारांना आमंत्रीत करुन त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करुन आपली संगीतभूक भागविण्याकरीता मैफीलींचे  आयोजित करता करता या खऱ्या संगीत भूकेतून निर्माण झालेल्या एका संगीत चळवळीचे रुपांतर ‘मैफील’ या संस्थेत कधी झाले हे कुणालाच कळले नाही. आणि गतवर्षी या मैफीलने आपला रौप्य महोत्सव देखील साजरा केला.
 
19 व 20 फेब्रवारी रोजी वार्षिक संगीत महोत्सव
 
यंदाच्या वार्षिक संगीत महोत्सवाचे आयोजन 19 व 20 फेब्रवारी रोजी संध्याकाळी अलिबाग येथील सरखेल कान्होजी आंग्रे नगरीतील शाळेच्या प्रांगणात करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवात ‘कट्यार काळजात घुसली’ या बहुचर्चित चित्रपटाचे गायक महेश काळे यांचे गायन, उस्ताद शाहीद परवेझ यांचे सुपुत्न शाकीर खान व विख्यात सारंगिये साबीर खान यांची सतार-सारंगी जुगलबंदी, सुप्रसिद्ध ऑर्गनवादक जयंत फडके यांचे सोलो ऑर्गन वादन आणि लोकप्रिय गायिका सावनी शेंडे यांचे गायन  अशा भरगच्च  मैफिलीचे आयोजित करण्यात आले आहे.
 
 
नवोदित कलाकारांसोबतच प्रस्थापित कलाकारांना ऐकण्याचा योग
 
गेली पंचवीस वर्षे मैफिल, अलिबाग दर्जेदार संगीताच्या कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करीत आहे. गतवर्षी आपल्या रौप्यमहोत्सवी वार्षिक संगीतोत्सवात  विश्वविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे मंत्रमुग्ध करणारे तबलावादन अलिबागकर संगीत रसिकांना याची देही याची डोळा अनुभवायला मिळाले होते. गेल्या काही वर्षात या संगीत महोत्सवाच्या निमित्ताने पं. उल्हास कशाळकर, पं.रोणू मझुमदार, पद्मश्री पं. विजय घाटे, राकेश चौरासिया, अश्विनी भिडे, आरती अंकलीकर, पं. भवानी  शंकर यासारख्या दिग्गज कलाकारांसह अनेक नवोदित कलाकारांच्या सादरीकरणाने अलिबाग परिसरातील संगीत रसिकांना अभिजात संगीताची पर्वणी लाभली होती. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमांना अलिबागच्या संगीत रसिकांच्या उदंड उपस्थितीचा प्रतिसाद तर लाभत आहेच त्याचबरोबर पनवेल,  रेवदंडा, मुरु ड, नागोठणो, रोहा, पाली, चोंढी, ङिाराड या ठिकाणांहूनदेखील संगीत रसिक मोठ्या प्रमाणावर महोत्सवाला हजेरी लावत असतात. या वर्षी या महोत्सवात नवोदित कलाकारांसोबतच प्रस्थापित कलाकारांना ऐकण्याचा योग मैफिलने जुळवून आणला आहे.
 
साबीरखान यांची सारंगी आणि शाकीर खान यांची सतार यांच्या जुगलबंदीने प्रारंभ
 
 
या वर्षीच्या संगीत महोत्सवाची सुरु वात साबीरखान यांच्या सारंगी आणि शाकीर खान यांच्या सतार जुगलबंदीने  होत आहे. सूर व  लयीवर हुकुमत असलेले साबीर खान यांनी  संगीत विश्वातील एक उत्कृष्ट सारंगिये  म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. गतवर्षी उस्ताद झाकीर हुसेन यांना लेहरा साथ करणारे साबीर खान यांनी आपल्या सारंगीवादनाने उपस्थित संगीत रसिकांना मंत्नमुग्ध केले होते. त्यांच्यासह विख्यात सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांचे सुपुत्न शाकीर खां. युवा सतारवादक शाकीर हे सतार जुगलबंदी सादर करणार आहेत. उस्ताद शाहीद परवेझ इटावाह घराण्यातील आठव्या पिढीचे समर्थ सतारवादक आहेत. या दोन तुल्यबळ युवा वादकांची जुगलबंदी या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य असेल असा संगीत रसिकांचा अंदाज आहे. ख्यातनाम तबलावादक पं. आनिन्डो चटर्जी यांचे चिरंजीव अनुब्रोत चटर्जी हे त्यांना तबला साथ करणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशीची सांगता  लोकप्रिय गायक महेश काळे यांच्या गायनाने होणार आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असलेले महेश काळे यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील त्यांच्या गाजलेल्या गाण्यांद्वारे मराठी संगीत रसिकांच्या मनात एक आगळे स्थान निर्माण केले आहे. मैफिल च्या संगीत महोत्सवात या युवा गायकाची लोकप्रिय नाट्यपदे ऐकण्यास अलिबागकर संगीत रसिक उत्सुक आहेत.   
 
 
सुप्रसिद्ध ऑर्गन वादक जयंत फडके यांच्या सोलो ऑर्गनवादनाने दुस:या दिवसाची सुरुवात 
 
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरु वात सुप्रसिद्ध ऑर्गन वादक जयंत फडके यांच्या सोलो ऑर्गनवादनाने होत आहे. मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांचे पर्व संपुष्टात आल्यानंतर ऑर्गन हे वाद्य काहीसे दुर्मिळ झाले आहे. मा्त्र मैफिलने जयंत फडके यांचे सोलो ऑर्गन वादन आयोजित करून संगीत रसिकांना स्मरणरंजनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. गायनाचार्य रामकृष्णबुवा वङो यांचे नातू असणारे जयंत फडके यांच्या बोटात गंधर्व गायकीचा सूर आणि लालित्य लीलया खुलविण्याचे सामथ्र्य आहे. महोत्सवाची सांगता आघाडीच्या लोकप्रिय गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाने होत आहे. किराणा आणि ग्वाल्हेर गायकीचा अदभूत संगम असलेली सावनींची गायकी अनुभवणो रिसकांसाठी पर्वणी ठरणार आहे. मैफिल वार्षीक संगीत महोत्सवाच्या अधिक माहिती करीता संतोष वङो (9423381507) किंवा भालचंद्र देशपांडे (8888500025) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन मैफीलच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: The catch of 'Memphil' on February 19 and 20 in Sirkeel Kanhoji Angre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.