मांजरांना हक्काचं घर आणि प्रेम मिळवून देणाऱ्या जोडप्याचं ' फर्री वर्ल्ड '...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 07:00 AM2019-07-28T07:00:00+5:302019-07-28T07:00:02+5:30

‘त्यांनी ’एका अतोनात हाल सोसलेल्या मांजरांच्या कुटुंबाची ६० हजार रुपये देऊन सुटका केली.

Cats have a home and love in the couples ' Furry World ' ... | मांजरांना हक्काचं घर आणि प्रेम मिळवून देणाऱ्या जोडप्याचं ' फर्री वर्ल्ड '...

मांजरांना हक्काचं घर आणि प्रेम मिळवून देणाऱ्या जोडप्याचं ' फर्री वर्ल्ड '...

googlenewsNext

दीपक कुलकर्णी 
लोकमत न्यूज नेटवर्क 
माणसं आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. ते चुकीचे आहे. पण समाजाने ते काहीप्रमाणात स्वीकारले आहे. परंतु, प्राण्यांनाही अनाथालयात ठेवणे, त्यांच्याशी निर्दयीपणे वागणे हे फार वाईट आहे.. माणसांना भावना तरी व्यक्त करता येतात... पण मुक्या प्राण्यांचं काय..अशाच एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका प्रसंगातून ‘त्यांनी ’एका अतोनात हाल झालेल्या मांजरांच्या कुटुंबाची ६० हजार रुपये देऊन सुटका केली. आणि तिथेच सुरुवात झाली त्या जोडप्याच्या एका अभिनव आणि विधायक सामाजिक कार्याला.. त्या कौतुकास्पद व हरवत चाललेल्या माणुसकीच्या प्रांतात प्राणीमात्रांविषयी संवेदना जपणाऱ्या उपक्रमाचे नाव आहे.. फर्री वर्ल्ड हे निवारागृह..  


    फर्री वर्ल्ड सुरु केले त्या संवेदनशील जोडप्याचं नाव गायत्री केळकर- जोगळेकर आणि श्रीराम जोगळेकर.. हे दोघेही आयटीक्षेत्रात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला.. पण एका दिवशी छोटा भीम नावाचे मांजर आवडले म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी गेल्यावर तिथे गेले तेव्हा वेगळेच भयानक वास्तव समोर आले.. ते म्हणजे त्या गृहस्थाच्या टेरेसवर भिजत असलेल्या एका पिंजऱ्यात दोन पिलांसह त्यांची आई आणि एका बाजूला तिसऱ्या पिलांच्या तयारीच्या दृष्टीने बसलेला एक बोका.. हा प्रसंग वरवर बघता जरी साधा वाटला तरी त्यात एक गंभीर बाब दडलेली होती.. ती म्हणजे व्यावसायिक हेतूने त्या मादी मांजराची प्रजननाची नैसर्गिक क्षमता न पाहता फक्त आकर्षक पिल्ले जन्माला घालत त्यांच्यापासून मिळणारी आर्थिक गणित..

सध्या या निवारागृहातमध्ये जवळपास ४० एक मांजरे आहेत. त्यापैकी १५ मांजरे त्यांची स्वत:ची आहे आणि बाकीचे कुणी परदेशात जाताना ठेवलेलं, सांभाळणे शक्य नाही आणून दिलेलं, तुम्ही मांजर सांभाळतात तर आमचेही सांभाळा या भावनेतून आणि अगदी असंवेदनशील मनाने सांगायचे झाले तर नकळत पायरीवर  ठेवलेलं  यासगळ््यांसह सामावलेलं हे फर्री वर्ल्ड नावाच्या आनंदी कुटुंबाचे सदस्य आहेत. हे कुटुंब त्यांच्या आरोग्य, आहार- विहार यांसह विविध गोष्टीवर प्रयोग करते आहे. त्यात मांजरांच्या विष्ठेचे खत करुन त्यावर भाजीपाला पिकवण्यासारखा भन्नाट प्रयोगही त्यातूनच आलेला. 
  गायत्री म्हणाल्या, साडेतीन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या उपक्रमाच्या अभ्यासासाठी हे आम्ही संपूर्ण भारतभर फिरलो. त्यात मांजरांच्या विविध जाती, आरोग्य, खाद्यपदार्थ यांसारख्या गोष्टींचा शोध घेतला. त्यात माणसे, सोशल मीडिया या माध्यमांतून संवादाचे माध्यम तयार करत प्राणीमात्रांविषयी आवड व जिव्हाळा असलेल्या लोकांचा एक समूह करत त्यांनाही या उपक्रमात जोडून घेतले.
आमच्या कुटुंबात शेरा, शेरी, ज्ञाना, माऊली, राधा, स्नोबेल, काशी, आईस, शिवा, जुलु, जुजु, जुजी, फिओना, अशी त्यापैकी काहींची नावे असलेली मांजरे आनंदाने नांदत आहे. आठवड्यातून एकदा सर्व मांजरींना स्वच्छ अंघोळ, केस- नख कापणे तसेच आहारात नॉनव्हेज यांसह त्यांचा संडे स्पेशल करण्याकडे आमचा कल असतो. तसेच मूल होत नाही किंवा मुलांची जबाबदारी समजावी यांसारख्या उद्देशांनी मांजरी घरी नेणारी जोडपेही आमच्याकडे येतात. 
 श्रीराम जोगळेकर म्हणाले,  हे त्यांचे प्रजनन व आरोग्य बघताततर गायत्री ह्या आहार, विहार, स्वच्छता..रोजच्या रोज ज्या खोलीत  या सर्व मांजरांची निवासाची व्यवस्था असते ती खोली दिवसातून दोनदा स्वच्छ केली जाते. यात पर्शियन व इंडियन अशा दोन्ही प्रकारातल्या मांजरांचा सहभाग त्यांच्या कुटुंबात आहे. 
पुण्यात इतकी वर्ष प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी कोणतीही सोय नाही. त्यासाठी मुंबई गाठाली लागत असत. नाहीतर मग एखाद्या निर्जनस्थळी त्यांना पुरायचे. पण प्राण्यांना जाळण्याची तसेच त्यांना नेण्याची काहीच व्यवस्था आपल्याकडे नाही. . पण यात एक समाधानाची बाब म्हणजे कुठेतरी  
मागील सहा महिन्यांपूर्वी पुण्यात मांजरांच्या देहाची विल्हेवाट लावण्याची व़्यवस्था करण्यात आली आहे. नाहीतर माणसे मांजर मेले म्हटले तरी शंकास्पद नजरेने पाहायची. ही गोष्ट मनाला फार अस्वस्थ करुन गेली.

..............
 कुणालाही मांजर घ्यायचे असेल तर त्याच्याकडून आम्ही जबाबदारीला बांधिल असल्याचा फॉर्म भरुन घेतो. तसेच त्याची कौटुंबिक , मानसिक, शारीरिक , आर्थिक क्षमतेची चौकशी करतो. कारण या उपक्रमातून कोणताही आर्थिक व्यवसाय करण्याचा आमचा हेतू नाही. फक्त लोकांनी प्राणी आपल्यावरती जो विश्वास ठेवतात त्याला कुठेतरी जागले पाहिजे ही भावना त्यामागे आहे. त्यांच्या जीवाशी न खेळता त्यांची घेतलेली जबाबदारी पूर्णपणे पेलली पाहिजे- श्रीराम जोगळेकर, फर्री वर्ल्ड.  
 
चौकट 
 विविध स्पर्धांमध्ये काही मांजरांनी पारितोषिके मिळविली आहे. पण आम्ही गोवा, कोल्हापूर यांसारख्या ठिकाणी मांजरींचे स्वतंत्र वसतीगृह निर्माण करणाऱ्यांना शक्य ती मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. कुणालाही या संदर्भात काही मार्गदर्शन हवे असेल तर ते नेहमी देण्यासाठी तयार आहोत. फक्त मुक्या प्राण्यांशी जागरुकता व दयाभाव निर्माण करण्यासाठीचा हा सर्व खटाटोप आहे.भविष्यात देखील आम्हांला प्राण्यांसोबतच जगायचे आहे. त्यामुळे शहराच्या बाहेर एखाद्या निवांत स्थळी आम्ही जागा विकत घेऊन तिथे विस्तार स्वरुपात संस्था उभी करायची - गायत्री जोगळेकर, फर्री वर्ल्ड. 

Web Title: Cats have a home and love in the couples ' Furry World ' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे