मापारी मामांच्या ‘पोह्यां’साठी खवय्यांची गर्दी!

By Admin | Published: August 10, 2016 02:16 PM2016-08-10T14:16:15+5:302016-08-10T17:38:49+5:30

सोलापूर शहरातील मापारी मामांच्या ‘पोह्यां’ची चर्चा जिल्हयात जोर धरु लागली असून या पोहयांची चव चाखण्यासाठी खवय्यांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.

Cattle rush for 'pawns' of measurable mangoes! | मापारी मामांच्या ‘पोह्यां’साठी खवय्यांची गर्दी!

मापारी मामांच्या ‘पोह्यां’साठी खवय्यांची गर्दी!

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १० -  शहरातील सिव्हिल लाईन भागातील जुन्या जिल्हा परिषद सभापती निवासस्थान परिसरात असलेल्या मापारी मामांच्या ‘पोह्यां’ची चर्चा आता जिल्हयात जोर धरु लागली आहे. जिल्हयात प्रसिध्द झालेल्या या पोहयांची चव चाखण्यासाठी खवय्यांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.
रस्त्याच्या कडेवर असलेले हे छोटेसं हॉटेल जिल्हयात मोठया झपाटयाने प्रसिध्द झालं त्याचं कारण केवळ तेथे मिळत असलेले पोहे. एका विशिष्ट पध्दतीने तयार केल्या जात असलेले पोहे जिल्हयातील नागरिकांना भावले व याची चर्चा संपूर्ण जिल्हयात वाºयासारखी झाली. तेथे पोहे खायचे असल्यास खवय्यांना वेटींग करावी लागत आहे. दररोज १० ते ११ पोते पोहे येथे खवय्ये फस्त करीत असल्याची माहिती मापारी मामांच्या येथे काम करणाºयांनी दिली. कॉलेजबॉय, सकाळी कर्तव्यावर जाणारे कर्मचाºयांसह अनेक नागरिक सकाळचा नाश्ता सुध्दा येथे जावून खाण्याला पसंती देत आहेत.

Web Title: Cattle rush for 'pawns' of measurable mangoes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.