कपाशीचे दोन रसशोषक कीड प्रतिबंधक वाण विकसित!

By admin | Published: July 27, 2014 10:50 PM2014-07-27T22:50:03+5:302014-07-27T23:03:38+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विकसित वाण, दक्षिण भारत व महाराष्ट्रासाठी शिफारस.

Cauliflower develops two juvenile pest resistant varieties! | कपाशीचे दोन रसशोषक कीड प्रतिबंधक वाण विकसित!

कपाशीचे दोन रसशोषक कीड प्रतिबंधक वाण विकसित!

Next

राजरत्न सिरसाट / अकोला
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने रसशोषक कीड प्रतिबंधक क पाशीचे दोन नवे वाण विकसीत केले असून, बीटी कापसाएवढेच उत्पादन अपेक्षित असलेल्या यातील एका वाणाची खास दक्षिण भारतासाठी, तर दुसर्‍या वाणाची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. या दोन्ही वाणांना संयुक्त संशोधन समितीने मान्यता दिली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक देशी व अमेरिकन वाण विकसीत केले आहेत. त्यापैकी ह्य४६८ह्ण या वाणाने देशातील कापूस उत्पादनात क्रांती केली आहे; तथापि अलीकडे कपाशीवर रस शोषण करणार्‍या किडींचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशकांचा वापर वाढल्याने, शेतकर्‍यांच्या खर्चात दुपटीने वाढ झाली. यावर उपाय म्हणून, कृषी विद्यापीठाने रसशोषक किडीला प्रतिबंधक असे ह्यएकेएच-९९१६ह्ण हे नवे (अमेरिकन) सरळ वाण विकसीत केले आहे. कोरडवाहू क्षेत्रात सुमारे १७0 ते १८0 दिवसात पीक हाती येणार्‍या या वाणाचे प्रति हेक्टरी अपेक्षित उत्पादन १२ ते १४ क्विंटल एवढे आहे. या वाणाची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाने ह्यएकेएच २00५-0३ह्ण हे दुसरे नवे देशी कापसाचे वाण दक्षिण भारतासाठी विकसित केले आहे. कोरडवाहू क्षेत्रात प्रति हेक्टरी ८ ते १0 क्विंटल कापसाचे उत्पादन देणारे हे वाण आखूड धाग्याचे असल्याने, या कापसाचा वापर वैद्यकीय उपयोगासाठी (सजिर्कल कॉटन) होईल.
*बीटीला पर्याय ठरणार!
गत काही वर्षात देशभर बीटी कापसाचे प्रस्थ वाढले असून, जवळपास एक कोटी वीस लाख हेक्टर क्षेत्रावर बीटी कापसाची पेरणी केली जात आहे. बीटी कापूस बोंडअळीला प्रतिबंध करतो; तथापि बीटी कपाशीवर रसशोषक किडीचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. त्यासाठी किटकनाशकांची फवारणी करावी लागते; परंतु ह्यएकेएच-९९१६ह्ण हे वाण रसशोषक किडीला प्रतिबंधक असल्याने, या कापसाचा पेरा वाढेल, अशी शास्त्रज्ञांना खात्री आहे.

Web Title: Cauliflower develops two juvenile pest resistant varieties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.