व्यंगचित्रांमुळे गोंधळही

By admin | Published: May 4, 2016 11:00 PM2016-05-04T23:00:41+5:302016-05-04T23:00:41+5:30

व्यंगचित्रकारांच्या कुंचल्याच्या आविष्कारावरही अनेकदा प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. कधी देवतांचा अपमान, कधी नेत्यांचा अपमान असा ठपका ठेवला

Causes of cartoons | व्यंगचित्रांमुळे गोंधळही

व्यंगचित्रांमुळे गोंधळही

Next

व्यंगचित्रकारांच्या कुंचल्याच्या आविष्कारावरही अनेकदा प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. कधी देवतांचा अपमान, कधी नेत्यांचा अपमान असा ठपका ठेवला गेल्याने व्यंगचित्रकारांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. चार्ली हेब्दो या नियतकालिकामध्ये छापलेल्या व्यंगचित्रांना विरोध म्हणून त्याच्या मुख्य कार्यालयावर दहशतवादी हल्लाच करण्यात आला होता. भारतातही व्यंगचित्रांवर अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत. शंकर्स विकलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्या चित्रावरून लोकसभेत गदारोळ झाला होता. भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या असीम त्रिवेदीला न्यायालयीन खटल्याचा सामना करावा लागला होता.

अशा घटना भारतासह देशभरामध्ये अधूनमधून घडताना दिसून येतात. याबाबतीतील सर्वात लक्ष वेधून घेणारे उदाहरण पश्चिम बंगालमधील आहे. जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापक अंबिकेश महापात्रा यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढल्यामुळे त्यांच्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठविली. त्यांच्यावर खटलाही गुदरण्यात आला. मात्र महापात्रा त्यातून सहीसलामत सुटले, त्यांना मानवाधिकार आयोगाने नुकसानभरपाईदेखिल मिळवून दिली. प. बंगालच्या सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ निवडणुकीत महापात्रा बेहाला (पूर्व) मतदारसंघातून लढत आहेत. त्यांना काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला आहे.

Web Title: Causes of cartoons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.