‘डोसा, फिरोजला फाशीचीच शिक्षा द्या’ सीबीआयची मागणी
By admin | Published: June 28, 2017 02:00 AM2017-06-28T02:00:55+5:302017-06-28T02:00:55+5:30
१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले मुस्तफा डोसा व फिरोज खान यांना याच प्रकरणी फाशी चढविण्यात आलेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले मुस्तफा डोसा व फिरोज खान यांना याच प्रकरणी फाशी चढविण्यात आलेल्या याकुब मेमनप्रमाणे फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला केली. या बॉम्बस्फोटात या दोघांची भूमिका मेमनप्रमाणे महत्त्वाची आहे, असा युक्तिवाद सीबीआयने केला.
१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी ‘केस बी’ मध्ये विशेष न्यायालयाने मुस्तफा डोसा व फिरोज खानला दोषी ठरवले आहे. साखळी बॉम्बस्फोटासाठी तयार केलेल्या चार पथकांपैकी एका पथकाचा मुस्तफा डोसा म्होरक्या असल्याचा सीबीआयचा दावा विशेष न्यायालयाने मान्य केला आहे. तसेच फिरोज खाननेही या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. याचाच आधार घेत सीबीआयने या दोघांचीही बॉम्बस्फोटातील भूमिका याच प्रकरणी फाशी सुनावलेल्या याकूब मेमन इतकीच महत्त्वाची असल्याचा दावा विशेष न्यायालयात केला.