माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का, मुलगी आणि सुनेवर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 11:33 AM2023-11-21T11:33:13+5:302023-11-21T11:33:49+5:30

छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये आज या संदर्भात बोलताना माझी स्क्रिप्ट शरद पवार लिहून देत नव्हते आणि आताही अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले. 

CBI files charge sheet against former Home Minister Anil Deshmukh, daughter and daughter-in-law | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का, मुलगी आणि सुनेवर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का, मुलगी आणि सुनेवर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) चांगलाच झटका दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत पुन्हा एक मोठी बातमी समोर आलीये. केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या क्लीनचीट अहवालाची माहिती लीक केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात पूजा यांच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूजा यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागासोबत कट रचला होता. त्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाल देण्यासाठी लाच देण्याची योजना केली होती. २९ऑगस्ट २०२१ रोजी हा अहवाल माध्यमांमधून लीक झाला होता.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर सीबीआयने चौकशी केली होती. त्याच प्रकरणात क्लीन चिट अहवाल हा लीक झाला होता. त्यामुळे सीबीआय अहवाल लीक प्रकरणात अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक केली होती.

काय होते प्रकरण?
मुंबईते तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा हा आरोप होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजा यांनी लीक केल्याचा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असे म्हटले असल्याचा दावा करण्यात आला. 

Web Title: CBI files charge sheet against former Home Minister Anil Deshmukh, daughter and daughter-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.