सीबीआय चौकशी करा
By admin | Published: June 5, 2014 02:45 AM2014-06-05T02:45:49+5:302014-06-05T02:45:49+5:30
लोकनेते तथा केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या लाखो कार्यकत्र्यानी प्रचंड घोषणाबाजी केली़ त्यामुळे वातावरण अतिशय भावुक झाले होत़े
Next
>उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर संतप्त कार्यकर्ते झाले शांत
संजय तिपाले - बीड
लोकनेते तथा केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या लाखो कार्यकत्र्यानी प्रचंड घोषणाबाजी केली़ त्यामुळे वातावरण अतिशय भावुक झाले होत़े मात्र, आ़ पंकजा पालवे यांची भावनिक साद व शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतरच कार्यकर्ते शांत झाले.
गोपीनाथराव मुंडे यांचे पार्थिव वैद्यनाथ कारखाना परिसरात आणण्यापूर्वीपासूनच कार्यकत्र्यातून घोषणांचा पाऊस सुरु होता़ परत या़़ परत या़़ मुंडे साहेब परत या़़़, गोपीनाथ मुंडे अमर रह़े़़ या घोषणांबरोबरच ‘सीबीआय चौकशी झालीच पाहिज़े़’ अशा घोषणाही देण्यात आल्या़ याशिवाय नितीन गडकरी यांच्या विरोधातही कार्यकत्र्यानी घोषणा सुरु केल्या़ मुंडेंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल़े यावेळी तासभर कार्यकत्र्यानी प्रचंड गर्दीत अंत्यदर्शन घेतल़े त्यानंतर घोषणा देणारे कार्यकर्ते बॅरिकेटस्ला चिकटून उभे होत़े त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अधिकच संतप्त झाल़े आ़ पंकजा पालवे यांनी कार्यकत्र्याना संयम राखण्यास सांगितल़े
‘तुम्हाला बाबांची शपथ आहे, तुम्ही शांत राहा़़ अंत्यदर्शनाला गालबोट लागेल असे कृत्य करु नका असे त्या अश्रू ढाळत म्हणाल्या़ त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या हातात माईक घेऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण करणार असल्याचे सांगितल़े त्यानंतर कार्यकत्र्यानी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला़ पंकजा, उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर कार्यकत्र्याना दिलासा मिळाला त्यानंतर घोषणाही कमी झाल्या़ त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली़