सीबीआय शीना बोरा खुनाचा तपास करणार का?

By admin | Published: September 19, 2015 03:25 AM2015-09-19T03:25:04+5:302015-09-19T03:25:04+5:30

शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी, आधीच मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे आणखी ए

CBI to investigate Sheena Bora murder? | सीबीआय शीना बोरा खुनाचा तपास करणार का?

सीबीआय शीना बोरा खुनाचा तपास करणार का?

Next

- डिप्पी वांकाणी,  मुंबई

शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी, आधीच मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे आणखी एक नवे प्रकरण सीबीआय हाती घेणार का, असा प्रश्न आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाचा तपास करताना मनुष्यबळाच्या टंचाईचा मुद्दा सीबीआयने उपस्थित केला होता. सध्या सीबीआयकडे अभिनेत्री जीया खानचा संशयास्पद मृत्यू आणि पोलीस कोठडीत मरण पावलेल्या २४वर्षीय अ‍ॅग्नेलोच्या मुख्य प्रकरणांसह अनेक तपास आहेत.
सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शीना बोरा हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्याचे आम्हाला प्रसारमाध्यमातून समजले. परंतु आम्ही अधिकृत निरोपाच्या प्रतीक्षेत आहोत. नियमांनुसार आधी राज्य सरकार गृह मंत्रालयाला तो निर्णय पाठवील व त्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला कळविले जाईल. आम्हाला अजून तसा कोणताही निरोप मिळालेला नाही. आधी तो निर्णय आम्हाला समजू द्या त्यानंतर त्याच्याबद्दल काही बोलता येईल, असे सीबीआयच्या प्रवक्त्या कांचनप्रसाद यांनी सांगितले.
महाराष्ट्रात मनुष्यबळाच्या टंचाईला तुम्ही तोंड देत असताना चौकशीचे काम तुम्ही घेणार का, असे विचारता कांचनप्रसाद यांनी भाष्य करण्याचे टाळले. गेल्या वर्षी नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सहा अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती करावी, अशी मागणी सीबीआयने केली होती. मात्र, शीना प्रकरणात स्थानिक पोलीस अधिकारी नसतील, असे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के.पी. बक्षी यांनी सांगितल्याने सीबीआयपुढे मनुष्यबळाचे मोठे प्रश्नचिन्ह आहे.

सीबीआयकडे राज्यातील महत्त्वाची प्रकरणे....
आदर्श घोटाळा
नरेंद्र दाभोलकर हत्या
जिया खान मृत्यू
भंडाऱ्यातील तीन बहिणींचा मृत्यू
अ‍ॅग्नोलोचा कोठडीतील मृत्यू
आरटीआय कायकर्ते संतोष शेट्टी हत्या प्रकरण

नीतिधैर्याचे खच्चीकरण?
पोलीस अधिकाऱ्यांचे नीतिधैर्य घटविण्याचाही या निर्णयामागे प्रयत्न असल्याचे बोलले जाते. पोलीस आयुक्तपदावरून ज्या घाईगर्दीने राकेश मारिया यांना हटविण्यात आले त्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही वरिष्ठ पोलीस अधिकारी खार पोलीस ठाण्याला भेट देत नाही. शीना बोरा प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवणाऱ्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने, चौकशांवर सह पोलीस आयुक्तांचे पर्यवेक्षण असते व त्यांनी आठवड्यातून फक्त एकदाच वरिष्ठांना कळवावे, असे सांगण्यात आलेले असते.
गेल्या वर्षी जावेद अहमद यांनी मुखर्जी दाम्पत्यासाठी इफ्तार पार्टी आयोजित केल्याचे उघड झाल्यानंतर जावेद यांनी गृह विभागाला इतर कोणत्याही चौकशी यंत्रणेकडे शीना बोरा प्रकरण सोपविण्यास माझी
काही हरकत नाही, असे सांगितले आहे. जावेद अहमद यांच्याकडे नुकतीच पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 

Web Title: CBI to investigate Sheena Bora murder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.