मुंबईतील रस्ते घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा- नारायण राणे

By admin | Published: July 28, 2016 07:12 PM2016-07-28T19:12:39+5:302016-07-28T19:12:39+5:30

मुंबईतील रस्ते घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी मागणी गुरूवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदेत केली.

CBI probe into Mumbai's road scam: Narayan Rane | मुंबईतील रस्ते घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा- नारायण राणे

मुंबईतील रस्ते घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा- नारायण राणे

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ : मुंबईतील रस्ते घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी मागणी गुरूवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदेत केली. आज विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे रस्ते घोटाळ्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या बांधणीसाठी देण्यात येणाऱ्या कंत्राट प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यामध्ये तब्बल नऊ हजार कोटींचा घोटाळा देण्याचा आरोप केला.

यामध्ये स्थायी समितीसह अनेक राजकारण्यांचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करून घोटाळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या राजकारण्यांची नावे उघड केली जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नारायण राणे यांच्या या प्रश्नाला गृहराज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी उत्तर दिले. रस्ते घोटाळ्याचा सध्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. गरज पडल्यास हा तपास सीबीआयकडे सोपवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पालिकेतील सध्याच्या प्रचलित पद्धतीने ही कंत्राटे देण्यात आली आहेत. या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून याप्रकरणी पालिकेचे कर्मचारी आणि कंत्राटदारांना ताब्यात घेण्यात आल्याचीही माहिती रणजित पाटील यांनी दिली. शहरातील १४ तर उपनगरातील २० रस्त्यांच्या बांधणी संदर्भातील हा घोटाळा आहे. मुंबईतील रस्त्यांमधील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली होती. त्याद्वारे केलेल्या प्राथमिक चौकशीत रस्त्यांच्या कामात ३४ ते १०० टक्क्यांपर्यंत घोळ आढळला होता.

Web Title: CBI probe into Mumbai's road scam: Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.