इंद्राणी, पीटर मुखर्जीच्या घरावर सीबीआय छापे

By admin | Published: May 17, 2017 12:45 AM2017-05-17T00:45:10+5:302017-05-17T00:45:10+5:30

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती यांच्याबरोबरच आयएनएक्स मीडियाचे इंद्राणी व पीटर मुखर्जी यांचे मुंबईतील वरळी येथील निवासस्थान तसेच कार्यालयांवर सीबीआयने

CBI raids at Indrani, Peter Mukherjee's house | इंद्राणी, पीटर मुखर्जीच्या घरावर सीबीआय छापे

इंद्राणी, पीटर मुखर्जीच्या घरावर सीबीआय छापे

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती यांच्याबरोबरच आयएनएक्स मीडियाचे इंद्राणी व पीटर मुखर्जी यांचे मुंबईतील वरळी येथील निवासस्थान तसेच कार्यालयांवर सीबीआयने मंगळवारी छापे टाकले. संबधित ठिकाणी रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती. त्याचा अधिकृत तपशील समजू शकलेला नाही.
इंद्राणी व पीटर मुखर्जी यांच्याविरुद्ध केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय) आर्थिक गैरव्यवहार व बनावट कागदपत्रे व फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हे दाखल केले. इंद्राणी मुखर्जीने २००७ मध्ये आयएनएक्स मीडिया आणि आयएनएक्स न्यूज या कंपन्या स्थापन केल्या होत्या.
त्याशिवाय न्यूज एक्स, ९ एक्स आणि ९ एक्स म्युझिक या कंपन्यांशी ते संलग्न होते. एअरसेल-मॅक्सिस यांच्या साडेतीन हजार कोटी रुपयांच्या व्यवहारास परकीय गुंतवणूक वृद्धी मंडळाद्वारे (एफआयपीबी) मंजुरी दिल्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी हे छापे मारले. एअरसेल-मॅक्सिसच्या व्यवहारात ६०० कोटींची मान्यता देण्यासंबंधी अर्थमंत्र्यांना अधिकार असताना चिदंबरम यांनी या मर्यादेचे उल्लंघन करून साडेतीन हजार कोटींच्या व्यवहाराला मान्यता दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Web Title: CBI raids at Indrani, Peter Mukherjee's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.