‘सिंहगड’ इन्स्टिट्यूटवर सीबीआयचे छापे

By admin | Published: April 22, 2017 04:31 AM2017-04-22T04:31:57+5:302017-04-22T04:31:57+5:30

उच्च शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या विविध कार्यालयांसह संस्थापक-अध्यक्ष मारुती नवले यांच्या राहत्या घरी आणि फार्म हाऊसवर कें द्रीय गुन्हे

CBI raids on 'Sinhagad' institute | ‘सिंहगड’ इन्स्टिट्यूटवर सीबीआयचे छापे

‘सिंहगड’ इन्स्टिट्यूटवर सीबीआयचे छापे

Next

पुणे : उच्च शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या विविध कार्यालयांसह संस्थापक-अध्यक्ष मारुती नवले यांच्या राहत्या घरी आणि फार्म हाऊसवर कें द्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी छापे टाकले. सेंट्रल बँकेच्या एका निवृत्त अधिकाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.
सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सुमारे ७५ कोटींचे कर्ज घेऊन ही रक्कम अन्यत्र वळवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी सीबीआयने नवले यांच्यासह सेंट्रल बँकेचे तत्कालीन सहाय्यक महाव्यवस्थापक ए. जी. सावंत, वरिष्ठ व्यवस्थापक विद्याधर पेडणेकर, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीसह पाच जणांविरुद्ध ३१ मार्च रोजी गुन्हा दाखल केला होता.
नवलेंनी कर्जासाठी अर्ज दाखल करताना संस्थेच्या सर्व शिक्षण संस्था आणि शाखांमध्ये नवीन बांधकाम, साहित्याचा पुरवठा, सुधारणेसोबतच नऱ्हे येथे नवीन डेंटल कॉलेज सुरु करणार असल्याची माहिती दिली होती. चुकीची माहिती देऊनही बँकेच्या कॉर्पोरेट शाखेचे सहायक महाव्यवस्थापक सावंत, यांनी नवलेंना कर्ज देण्याची शिफारस केली. त्यानुसार ७५ कोटी १ लाखांचे कर्ज १७ डिसेंबर २०१२ रोजी मंजूर करण्यात आले. कोणत्याही स्पष्ट प्रस्तावाशिवाय हे कर्ज देण्यात आले. कोणत्याही प्रकारची पडताळणी करुन पाहण्यात आली नव्हती. कर्जाची रक्कम देताना मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यात आली नाहीत. संस्थेने बनावट कागदपत्रे बँकेला सादर केली. त्यामध्ये आर्किटेक्ट प्लॅनसह नऱ्हे येथील डेंटल कॉलेजसाठी २१ कोटी २० लाखांचे बनावट कर्ज दाखवण्यात आले. वास्तवीक नऱ्हे येथे हे रुग्णालयच बांधण्यात आलेले नाही. बँकेच्या अधिकाऱ्यांनी या अपहारामध्ये नवले यांना साथ दिली. नवले यांनी कर्जाची परतफेड न केल्याने हे खाते एनपीएला गेले. बँकेला ५८ कोटी ४ लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्याअनुषंगाने हे छापे टाकण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

खाते, लॉकर्स तपासणार
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवले यांच्या घरासह एनडीए रस्त्यावरील फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला. यासोबतच सिंहगडच्या एरंडवण्यातील कॉर्पोरेट आॅफीससह वडगाव, नऱ्हे, लोणावळा, कोंढवा आणि वारज्यातील शाखांवरही छापे टाकण्यात आले. सावंत यांच्या नाशिकमधील राहत्या घरी आणि पेडणेकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. या सर्वांच्या बँक खात्यांसह लॉकर्सचीही तपासणी केली जाणार असल्याचे अधीक्षक एम. आर. कडोळे यांनी सांगितले.

Web Title: CBI raids on 'Sinhagad' institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.