इंद्राणीच्या आजारामागील रहस्य शोधणार सीबीआय
By Admin | Published: October 10, 2015 02:34 AM2015-10-10T02:34:45+5:302015-10-10T02:34:45+5:30
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी तिची आई इंद्राणी मुखर्जीला अलिकडेच अचानक प्रकृती बिघडल्याने इस्पितळात दाखल करण्यात आल्याबाबत संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे
नवी दिल्ली : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी तिची आई इंद्राणी मुखर्जीला अलिकडेच अचानक प्रकृती बिघडल्याने इस्पितळात दाखल करण्यात आल्याबाबत संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) करणार आहे. तपास संस्थेने महाराष्ट्र प्रशासनाला इंद्राणीच्या शरीरातून घेण्यात आलेले सर्व द्रव्यरूप नमुने सांभाळून ठेवण्यास सांगितले असून या घटनेचा अहवालही मागितला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास संस्थेने भायखळा कारागृहातील तपास अहवाल आणि अधिकाऱ्यांनी तयार केलेले इतर दस्तावेज तसेच या घटनेसंदर्भात केलेल्या कारवाईची माहिती राज्य सरकारला मागितली आहे.
शीना बोरा हत्याप्रकरणात कारागृहात असलेल्या तीन आरोपींचा सीबीआय येत्या १९ आॅक्टोबरला जाबजबाब घेणार आहे. प्रकृती अस्वास्थ्यानंतर इंद्राणीला गेल्या २ आॅक्टोबरला मुबईतील जे.जे. इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर चार दिवसांनी
तिला रुग्णालयातून सुटी
मिळाली होती. उपचारादरम्यान करण्यात आलेल्या विविध तपासण्यांमधून कारागृहात औषधांच्या अतिसेवनाबाबत परस्परविरोधी अहवाल प्राप्त
झाले होते. एकात तिने औषधांचे अतिसेवन केल्याचे सांगण्यात आले तर दुसऱ्यात त्याचे खंडन करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)