सीबीआयनेच आता लवकर रिपोर्ट द्यावा; अनिल देशमुखांची सुशांत आत्महत्येवरून मागणी
By हेमंत बावकर | Published: October 3, 2020 02:37 PM2020-10-03T14:37:21+5:302020-10-03T14:46:34+5:30
Sushant Singh Rajput: अनिल देशमुख नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना सुशांतच्या एम्स अहवालावरून प्रश्न विचारण्यात आला.
नागपूर : सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या हे कोडे तीन महिने लोटले तरीही सुटलेले नसून राजकारणाचे वादळही शमलेले आहे. मात्र, आज एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचा मृत्यू ही हत्या नव्हती असे म्हटल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने आता लोकांना सांगावे, लवकरात लवकर चौकशीचा अहवाल द्यावा, अशी मागणी केली आहे.
अनिल देशमुख नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना सुशांतच्या एम्स अहवालावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आमच्याकडे अधिकृत माहिती नाहीय. जशी माहिती मिळेल तशी आम्ही ती कळवू. यामुळे यावर काही वक्तव्य करणे उचित नाही. सीबीआय जी चौकशी करत आहे, तिचा अहवाल लवकरात लवकर यावा, लोकांच्या समोर यावा, यामुळे लोकांनाही सुशांतची हत्या की आत्महत्या ते समजेल, असे देशमुख म्हणाले.
थकलेल्या ईएमआयपेक्षा कितीतरी अधिक पटींनी या व्याजाचा भुर्दंड ग्राहकांना बसणार होता. यावर आता मोठा दिलासा मिळाला आहे.https://t.co/L596gHb7QP#emiMoratorium
— Lokmat (@MiLOKMAT) October 3, 2020
एम्सचा अहवाल
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने उलटले असून या प्रकरणी दर दिवशी नवीन खुलासे समोर येत आहे. १४ जून, २०२० रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. पण ही आत्महत्या आहे की हत्या, हे स्पष्ट झालेले नाही. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (All India Institute Of Medical Sciences, New Delhi)च्या डॉक्टरांच्या एका पॅनेलने सीबीआयला आपले मत देत सांगितले की अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या नाही झाली तर हे आत्महत्येचे प्रकरण आहे.
ऐन कोरोनाच्या काळात बँकांनी भरती केली आहे. ही संधी शेवटची नसेल परंतू परत अशी संधी येणार नाही. https://t.co/pH0cHmwepy
— Lokmat (@MiLOKMAT) October 3, 2020
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी साडे तीन महिन्यानंतर आलेल्या आत्महत्येच्या थेअरीला एम्स फॉरेंसिक टीमचा फायनल रिपोर्ट म्हटले जात आहे. हा रिपोर्ट एम्सच्या पॅनेलने सीबीआयकडे सुपूर्द केला आहे, ज्याचा सीबीआय अभ्यास करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या फॉरेंसिक पॅनेलने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी त्यांच्याकडून तपास पूर्ण केला आहे. इतकेच नाही तर सीबीआयला आपली वैद्यकीय आणि कायदेशीर मत देऊन फाइल बंद केली आहे. त्यानंतर आता सीबीआय एम्सच्या रिपोर्टसोबत त्यांच्या तपास जुळवून या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्यात जुंपली आहे.
सुशांतची हत्या झाली नाही, AIIMS च्या डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
— Lokmat (@MiLOKMAT) October 3, 2020