छोटा राजनसाठी सीबीआय पथक इंडोनेशियात
By Admin | Published: November 2, 2015 03:15 AM2015-11-02T03:15:56+5:302015-11-02T03:15:56+5:30
कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फराजन निकाळजेला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेचे (सीबीआय) एक पथक रविवारी इंडोनेशियात पोहोचले. या पथकात मुंबईतील गुन्हे शाखेतील तिघांचा समावेश आहे
मुंबई : कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फराजन निकाळजेला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेचे (सीबीआय) एक पथक रविवारी इंडोनेशियात पोहोचले. या पथकात मुंबईतील गुन्हे शाखेतील तिघांचा समावेश आहे. आवश्यक माहिती लागण्याच्या शक्यतेमुळे मुंबईच्या अधिकाऱ्यांना पाठविल्याचे सांगण्यात आले.
अडीच दशकांपासून फरारी असलेल्या छोटा राजनला इंडोनेशियातील बाली येथे जेरबंद करण्यात आले. आता राजनच्या ताब्यासाठी भारत सरकारकडून युद्धपातळीवर कार्यवाही केली जात आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनीही कंबर कसली आहे.
राजनविरुद्ध दाखल असलेल्या ७५हून अधिक गुन्ह्यांपैकी प्रमुख गुन्ह्यांचा सविस्तर तपशील बनवून तो इंडोनेशियाकडे सुपुर्द केला जात आहे.