सीबीआय करणार समीरची चौकशी

By admin | Published: March 25, 2016 02:15 AM2016-03-25T02:15:51+5:302016-03-25T02:15:51+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकामी चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या

CBI will investigate Sameer's inquiry | सीबीआय करणार समीरची चौकशी

सीबीआय करणार समीरची चौकशी

Next

कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकामी चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा जबाब नोंदविणार आहे. बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी ‘सीबीआय’च्या यासंबंधीच्या विनंती अर्जाला परवानगी दिली. त्यामुळे सीबीआयचे अधिकारी कळंबा मध्यवर्ती कारागृहात समीर गायकवाडची चौकशी करून त्याचा लवकरच जबाब घेण्याची शक्यता आहे. समीर गायकवाडचा जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी दुसऱ्यांदा फेटाळला. दरम्यान, दि. २९ मार्च रोजी पानसरे हत्येच्या सुनावणीवेळी समीर गायकवाड हा न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: CBI will investigate Sameer's inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.