आज सीबीएसईच्या बारावीचा निकाल
By admin | Published: May 28, 2017 01:56 AM2017-05-28T01:56:26+5:302017-05-28T01:56:26+5:30
बारावीच्या परीक्षा झाल्यावर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण मे महिन्यात सातत्याने बारावीच्या निकालाच्या खोट्या तारखांचे मेसेज फिरत असल्यामुळे
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावीच्या परीक्षा झाल्यावर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण मे महिन्यात सातत्याने बारावीच्या निकालाच्या खोट्या तारखांचे मेसेज फिरत असल्यामुळे विद्यार्थी, पालक त्रस्त झाले होते. मात्र आता बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल रविवार आॅनलाइन जाहीर होणार असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख
सोमवार, २९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा संपल्या. सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल लागतो. पण यंदा मे महिन्याच्या मध्यातच बारावीचा निकाल लागणार असे खोटे मेसेज सोशल नेटवर्किंग साइट्सवर फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शुक्रवारी रात्री उशिरा सीबीएसई बोर्डाने रविवारी बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल रविवारी दुपारी १२ वाजता सीबीएसईच्या ६६६.१ी२४’३२.ल्ल्रू.्रल्ल, ६६६.ूु२ी१ी२४’३२.ल्ल्रू.्रल्ल ६६६.ूु२ी.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. रविवारी फक्त आॅनलाइन निकाल जाहीर होईल. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी निकालाच्या प्रतीसाठी बोर्डाच्या कार्यालयात जाऊ नये, असे आवाहन सीबीएसई बोर्डातर्फे करण्यात आले आहे. यंदा देशभरातून सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेला १० लाख ९८ हजार ४२० विद्यार्थी बसले होते. ३ हजार ५०३ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.
एसएमएसचाही वापर
इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात आयसीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल सोमवार, २९ मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी ३ वाजता दोन्ही निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही निकाल कळणार आहेत.
दुसरीकडे शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची तारीख सोमवार, २९ मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. त्यानुसार ३० अथवा ३१ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.