सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

By admin | Published: May 20, 2014 03:30 AM2014-05-20T03:30:39+5:302014-05-20T03:30:39+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डामार्फत (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइनद्वारे जाहीर करण्यात आला

For the CBSE SSC examination result declared | सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

Next

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डामार्फत (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइनद्वारे जाहीर करण्यात आला. चेन्नई विभागातून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमधून सांताक्रुझ येथील आर.एन. पोद्दार शाळेतील आशुतोष महापात्रा या विद्यार्थ्याला ९७.६ टक्के गुण मिळाले. दहावी परीक्षेला मुंबईतून ५ हजार ३६१ विद्यार्थी बसले होते. सीबीएसईने सोमवारी दुपारी चेन्नई आणि तिरुअनंतपुरम् विभागाचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र राज्य चेन्नई विभागात येते. त्यानुसार सोमवारी राज्यातील सीबीएसई दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. परंतु या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अधिकृत माहिती सीबीएसईने सोमवारी जाहीर केली नाही. या परीक्षेला मुंबईतील सांताक्रुझ येथील आर.एन. पोद्दार शाळेतून १७९ विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांमधून आशुतोष महापात्रा या विद्यार्थ्यांने ९७.६ टक्के गुण मिळविले आहेत. तर ७३ विद्यार्थ्यांना ९0 टक्केहून अधिक गुण मिळाले आहेत.

Web Title: For the CBSE SSC examination result declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.