आवक वाढल्याने सीसीआयची खरेदी ठप्प; कापूस वाहतुकीचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 02:51 AM2020-02-20T02:51:24+5:302020-02-20T02:51:51+5:30
यंदा राज्यात कापसाचे उत्पादन चांगले झाले आहे. खासगी व्यापारी यांच्याकडून
अभिनय खोपडे
वर्धा : कापसाची निर्यात चीन मध्ये होण्यास कोरोनामुळे अडचणी येत आहेत. त्यात जादा भावामुळे कॉटन कॉर्पाेरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) च्या स्थानिक खरेदी केंद्रांवर कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने त्यांचे गोदाम फुल्ल झाले आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील ८ सीसीआयची कापूस खरेदी केंद्र बंद होण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
यंदा राज्यात कापसाचे उत्पादन चांगले झाले आहे. खासगी व्यापारी यांच्याकडून कापसाची खरेदी अत्यल्प प्रमाणात सुरू आहे. केंद्र सरकारच्या हमीभावानुसार सीसीआय वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची खरेदी करीत आहे. सुरुवातीला उच्च दर्जाचा कापूस सीसीआयने खरेदी केला. आता ग्रेडमध्ये बदल करूनही कापूस खरेदी केली जात आहे. जिल्हयातील आठ कापूस खरेदी केंद्रावर ५ लाख ९,८०० क्ंिक्टल कापसाची खरेदी करण्यात आली.
प्रति क्विंटल २०० रुपये जादा भाव
राज्य सरकारचा पणन महासंघ व खासगी व्यापारी यांच्याकडून दिल्या जाणाºया भावापेक्षा दोनशे रुपयांनी सीसीआयचा भाव अधिक आहे. सध्या ५ हजार ४५० रुपये भाव सीसीआयकडून दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस आणत आहे. मात्र, अनेक खरेदी केंद्रात कापसाने गोदाम भरले आहे.