मुंबई-गोवा महामार्गावर १५ ठिकाणी सीसीटीव्ही

By admin | Published: September 15, 2015 02:52 AM2015-09-15T02:52:31+5:302015-09-15T02:52:31+5:30

हमरापूर, खोपोली बायपास, अंतोरा फाटा, पेण नाका, वडखळ, वाकण, माणगाव, लोणेरे, विसावा(महाड), पोलादपूर, इंदापूर आणि मोर्बा नाका या १५ ठिकाणी सातत्याने वाहतूक

CCTV at 15 places on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर १५ ठिकाणी सीसीटीव्ही

मुंबई-गोवा महामार्गावर १५ ठिकाणी सीसीटीव्ही

Next

अलिबाग : हमरापूर, खोपोली बायपास, अंतोरा फाटा, पेण नाका, वडखळ, वाकण, माणगाव, लोणेरे, विसावा(महाड), पोलादपूर, इंदापूर आणि मोर्बा नाका या १५ ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. गणेशोत्सव काळात या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तेथे सीसीटीव्ही तैनात करण्यात आले आहेत. सीसीटीव्हीमुळे वाहतूक व्यवस्थापन करण्यास सोपे जात आहे. संभाव्य वाहतूक कोंडी व अपघात यांची शक्यता खूप कमी झाल्याचे रायगड वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख एम.आर. म्हात्रे यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावर रायगड पोलीस वाहतूक शाखेच्या माध्यमातून खारपाडा ते पोलादपूर दरम्यान के्रन व रुग्णवाहिका सुविधा ठेवण्यात आली आहे. तसेच सहा तंबू पोलीस चौक्या तर माणगाव, लोणेरे, कोलाड, वडखळ व पेण येथे कायमस्वरूपी विशेष पोलीस चौक्या स्थापन करून १७० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांद्वारे २४ तास वाहतूक व्यवस्था कार्यान्वित असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.

कोकणासाठी पर्यायी मार्ग
मुंबई-गोवा महामार्गाव्यतिरिक्त मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मुंबई-खालापूर पाली फाटा-वाकण-माणगाव-महाड), मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (सातारा-उंब्रज-पाटण-चिपळूण), मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (सातारा-कराड-कोल्हापूर-मलकापूर अंबाघाट मार्गे रत्नागिरी), मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (सातारा-कराड-कोल्हापूर-राधानगरी मार्गे कणकवली), मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (सातारा-कराड-कोल्हापूर-गगनबावडा मार्गे कणकवली), मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (सातारा-कराड-कोल्हापूर-आंबोली मार्गे सावंतवाडी) असे हे पर्यायी मार्ग आहेत.

Web Title: CCTV at 15 places on Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.